NEET UG Admit Card : नीट युजीचे प्रवेशपत्र उपलब्ध; 20 लाखांहून अधिक विद्यार्थी 7 मे रोजी देणार परीक्षा

संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात अडचण आल्यास neet@nta.ac.in वर सकाळी १० ते संध्याकाळी पाच या वेळेत ईमेल पाठवा
NEET UG Admit Card out exam education More than 20 lakh students appear for exam on May 7
NEET UG Admit Card out exam education More than 20 lakh students appear for exam on May 7esakal

NEET UG Admit Card : वैद्यकीय प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा नीट युजीचे प्रवेशपत्र अखेर उपलब्ध झाले आहे. रविवारी (ता.७ ) होणाऱ्या राष्ट्रीय पात्रता-सह-प्रवेश परीक्षेचे प्रवेशपत्र नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी केले आहे. या व्यतिरिक्त उमंग आणि डिजीलॉकर या अतिरिक्त प्लॅटफॉर्मवरून देखील डाउनलोड करता येऊ शकते.

एनटीएने विद्यार्थ्यांसाठी मदत क्रमांक जारी केला आहे. संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाउनलोड करण्यात अडचण आल्यास neet@nta.ac.in वर सकाळी १० ते संध्याकाळी पाच या वेळेत ईमेल पाठवा, असे एनटीएच्या वतीने सांगण्यात आले आहे. या वर्षी तब्बल २१ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. नीटची परीक्षा रविवारी दुपारी २ ते संध्याकाळी साडेपाच या वेळेत होणार आहे.

ही परीक्षा इंग्रजी, हिंदी, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ, तेलुगु आणि उर्दू अशा १३ भाषांमधून होणार आहे. परीक्षा ऑफलाइन (पेन आणि पेपर-आधारित) होणार आहे. परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र/जैवतंत्रज्ञान या विषयांवरील १८० बहूपर्यायी प्रश्न विचारले जाणार आहेत. हे प्रश्न ११ वी आणि १२ वी च्या अभ्यासक्रमावर आधारित असतील.

प्रवेशपत्रासाठी अधिकृत संकेतस्थळ : neet.nta.nic.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com