RTE Admission : आरटीई २५ टक्के अंतर्गत प्रवेशासाठी बुधवारपासून ऑनलाइन अर्ज करता येणार

दरवर्षीप्रमाणे यंदाही (शैक्षणिक वर्ष २०२३-२४) शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.
RTE Admission
RTE AdmissionSakal
Summary

दरवर्षीप्रमाणे यंदाही (शैक्षणिक वर्ष २०२३-२४) शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात.

पुणे - शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी बालकांचे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा बुधवारी (ता. १) दुपारी तीन वाजल्यापासून सुरू करण्यात येत आहे. कोरोना काळात पालक गमाविलेल्या बालकांनाही यंदा या प्रवेश प्रक्रियेतंर्गत राखीव जागांवर प्रवेश मिळणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही (शैक्षणिक वर्ष २०२३-२४) शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी प्राथमिक शिक्षण विभागातर्फे ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पालकांना ‘https://student.maharashtra.gov.in’ या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. तसेच शिक्षण विभागाने ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहे. त्यानुसार, कोरोना काळात म्हणजे १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत एक किंवा दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांना यंदा या प्रक्रियेतंर्गत प्रवेश दिला जाणार आहे.

या प्रवेश प्रक्रियेत वंचित गटातील बालकांच्या प्रवेशासाठी वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा लागू नाही. तर वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. या प्रक्रियेत पालकांनी विचारपूर्वक १० शाळांची निवड करावी. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी शिक्षण विभागाने १७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर शिक्षण विभागातर्फे सोडत काढण्यात येईल. त्यात निवड झालेल्यांची नावे जाहीर करण्यात येतील. त्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.

पालकांसाठी सूचना -

- दिलेल्या मुदतीत एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा

- अर्ज करताना अचूक व खरी माहिती द्यावी

- यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतल्यास त्या बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही

- कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करण्यात येऊ नयेत

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे -

- निवासी पुरावा : रेशनिंग कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र आदी

- जन्म तारखेचा पुरावा : जन्मदाखला, पालकांनी प्रतिज्ञा पत्राद्वारे केलेले स्वयंनिवेदन

- सामाजिक वंचित जात संवर्गातील बाल असल्यास वडिलांचा/बालकांचा जातीचा दाखला

- आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातून प्रवेशासाठी वार्षिक उत्पन्नाचा दाखला

- दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com