esakal | अकरावी सीईटी अर्जातील चुका दुरुस्तीची संधी
sakal

बोलून बातमी शोधा

cet form.jpeg

अकरावी सीईटी अर्जातील चुका दुरुस्तीची संधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) अकरावीच्या (FYJC) प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी (CET) वादात अडकली असताना आता यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांना त्यातील चुका दुरुस्त करण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना सोमवार, २ ऑगस्टच्या रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ही मुभा असेल, असे मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले. (Opportunity Correct Errors FYJC Cet Application)

ई-मेल आयडी, मोबाइल क्रमांक, माध्यम, सेमी इंग्रजी, निवासी पत्ता, जिल्हा, विभाग, एसईबीसी, ईडब्ल्यूएस प्रवर्गासंदर्भातील चुका दुरुस्त करता येतील.

एकच अर्ज ग्राह्य

सीईटीची नोंदणी करताना अनेक विद्यार्थ्यांनी अधिक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्याने मंडळाकडून दुरुस्तीचा हा पर्याय दिल्याचेही सांगण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांनी अनेक अर्ज व पर्याय दिले आहेत, अशा विद्यार्थ्यांचा केवळ एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे. जादाचे अर्ज विद्यार्थ्यांनी काढून टाकावेत. ही सुविधा १ ऑगस्ट सकाळी ११ वाजल्यापासून आहे. अर्जात बदल करण्यासाठी विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर जाऊन अॅप्लिकेशन क्रमांक व संगणक प्रणालीतील मोबार्इल क्रमांक टाकून लॉगीन करता येईल. काही अडचणी असल्यास विद्यार्थ्यांनी हेल्पलाईनवर संपर्क साधावा.

loading image
go to top