इमॅन्युएल कॅंट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस संधी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 January 2020

भारतात एमबीबीएस प्रवेश इतके सोपे नाही कारण विद्यार्थ्यांना आता त्यांच्या बारावीच्या परीक्षेनंतर राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) तर्फे घेण्यात आलेल्या मल्टीपल चॉइस प्रश्न (MCQ's) राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) पात्र होणे आवश्यक आहे. २०१९ मध्ये १४ लाखाहून अधिक विध्यार्थानी नीट परीक्षा देण्यासाठी फॉर्म भरले.

आमचे गुणवंत विद्यार्थी भविष्यात युरोपियन युनियनमध्ये जर्मनी, पोलंड, लाटविया, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क विद्यार्थी विनिमय कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात : डॉ. अमित कामले

प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल काळजीत असतो , विशेषत: विज्ञानशाखेत स्पर्धेमुळे आणि भारतभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कमी जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थी जर एमबीबीएस कोर्सेला सीट नाही मिळालीतर करिअरचा प्रवाह एक तर पॅरामेडिकल कोर्समध्ये बदलण्यास प्राधान्य देतात. भारतात एमबीबीएस प्रवेश इतके सोपे नाही कारण विद्यार्थ्यांना आता त्यांच्या बारावीच्या परीक्षेनंतर राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) तर्फे घेण्यात आलेल्या मल्टीपल चॉइस प्रश्न (MCQ's) राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (NEET) पात्र होणे आवश्यक आहे. २०१९ मध्ये १४ लाखाहून अधिक विध्यार्थानी नीट परीक्षा देण्यासाठी फॉर्म भरले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतात एकूण एमबीबीएसच्या अंदाजे जागा ७८,००० इतक्‍या मर्यादित आहे. भारतात नीटमध्ये उच्च पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकेल. परंतु जे विद्यार्थी नुकतेच किमान ग्रेडसह पात्र आहेत ते एक तर पुन्हा परीक्षा देतात किंवा डॉक्‍टर होण्याचे स्वप्न सोडून शाखा बदलतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या नुसार भारतात डॉक्‍टरांची कमतरता आहे. भारतानंतर रशिया हे विद्यार्थ्यांसाठी अनुकूल ठिकाण आहे. 

Image may contain: 35 people, people smiling, people standing, wedding and indoor

जरी चीन, किर्गिझस्तान, युक्रेन, जॉर्जिया, फिलिपिन्स, नेपाळ यासारख्या अनेक देशांनी भारतीय विद्यार्थ्यांना कमी फी, कॅम्पसमध्ये खानावळ, अभ्यासक्रम कमी कालावधीत पूर्ण करणे ह्यावरून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असला तरी भारतीय विद्यार्थ्यांनी या देशांमध्ये विद्यापीठात वैद्यकीय शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड करू नये मात्र गुणवतेला प्राधान्य देणाऱ्या जागतिक दर्जाच्या परदेशी विध्यापीठानंच प्राधान्य द्यावे. 

भारत आता कल्पनांनी जगावर वर्चस्व गाजविणार

अंदाजे १९५० पासून भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी रशियाला जात आहेत आणि परदेशात वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या इतर देशांच्या तुलनेत भारतीय विद्यार्थ्यांना स्वीकारणे यामध्ये रशिया हा अनुभवी देश ठरला आहे. रशिया हा भारताचा मित्र आहे. वर्षानुवर्षे रशियामध्ये देखील कमी पायाभूत सुविधा असलेले स्टेट युनिव्हर्सिटी आहेत. त्यांच्या पॉकेट फ्रेंडली बजेटमुळे पालक अनेकदा या युनिव्हर्सिटीच्या मार्केटिंगच्या जाळ्यात अडकतात आणि विद्यार्थ्यांना विशिष्ट विद्यापीठात प्रवेश केल्यानंतरच त्याचे परिणाम समजतात. 

रशियाच्या इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस प्रवेशासाठी कोणतीही देणगी आणि कॅप्शन फी स्वीकारली जात नाही. विशेष म्हणजे हे विध्यापीठ "फेडरल" आहे. इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी (आयकेबीएफयू) हे रशियाचे सर्वात पश्‍चिम युरोपियन प्रदेश कॅलिनिनग्राड शहरामधील रशियाचे प्रमुख फेडरल विद्यापीठ आहे. जर्मनी, पोलंड, लाटविया, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क अशी युरोपियन राष्ट्रे क्लीनिनग्राड शहारा पासून जवळ आहेत. इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी जागतिक आरोग्य संघटना, मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया मान्यता प्राप्त आहे आणि क्‍यूएस वर्ल्ड रॅंकिंग ऑफ युनिव्हर्सिटीज, ब्रिक्‍स, जगातील अव्वल विद्यापीठांमध्ये सूचीबद्ध आहे. संपूर्ण इंग्रजी माध्यमामध्ये वैद्यकीय शिक्षणाचा कालावधी ६ वर्षे आहे. सिमुलेशन क्‍लिनिक, डायग्नोस्टिक सेंटर, कार्डिओ आणि पेडियाट्रिक सेंटर, 3-डी अध्यापनाची तंत्रज्ञान, भारत केंद्रित अभ्यासक्रम, केंद्रीकृत लायब्ररी, भारतात परतल्यावर एमसीक्‍यूच्या (MCQ's) पुढच्या नॅशनल एक्‍झीट टेस्ट (NEXT) ची तयारी पहिल्या वर्षापासूनच विद्यापीठामध्ये करून घेतली जाते.  यामुळे इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी रशियामधील भारतीय विद्यार्थ्यांसाठी सर्वात प्राधान्य आणि आवडते विद्यापीठ आहे. 

मुलांनो 2020 आलंय; करिअर घडविण्यासाठी हे कराच!

उत्तम पायाभूत सुविधा आणि स्वच्छ वसतिगृहे ही विद्यापीठाची वैशिष्ट्ये आहेत. रशियामध्ये मुले व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे नाहीत. म्हणूनच इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीच्या स्वतंत्र वसतिगृहांमध्ये सुरक्षित मुक्काम पालकांना त्यांच्या मुलांच्या सुरक्षेबद्दल आश्वासन देते. वसतिगृहांमध्ये आधुनिक टॉयलेट, बाथरूम, वॉशिंग मशीन, किचेन, वसतिगृहातील वाचन खोल्या, विनामूल्य WIFI, 24*7 सुरक्षा सुविधा उपलब्ध आहेत. जलतरण, व्यायामशाळा आणि क्रीडासंकुल देखील आहे. दरवर्षी भारतीय विद्यार्थी आपली कलागुण प्रदर्शित करण्यासाठी "इंडियन एक्‍स्ट्रागॅन्झा" आयोजित करतात जेणेकरून दोन देशांमध्ये सांस्कृतिक संबंधही निर्माण होतात.

डॉ. अमित कामले, एम.डी (रशिया) इमॅन्युएल कांट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीच्या प्रथम कुलगुरूंचे सल्लागार सकाळशी बोलले, " १२वी च्या गुणवतेला हा पहिला प्राधान्य आम्ही देतो, इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी भौतिकी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रामध्ये ५०% गुण असणे अनिवार्य आहे . तसेच नीट "क्वालिफाय" (नीट मधील खुला व आरक्षित किमान पात्रता गुण) असणेही अनिवार्य आहे.  ह्या शिवाय विध्यापीठ एक सामान्य अँटिट्यूड टेस्ट ही चाचणी परीक्षा प्रवेशासाठी घेते. शैक्षणिक शुल्क स्वस्त व परवडणारी आहे. वार्षिक हजेरी आणि परीक्षेत उत्तम गुणवत्ता मिळवलेल्या विध्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती आहेत. क्लीनिनग्राड हे युरोपच्या मध्यभागी असल्याने पॅरा क्‍लिनिकल अभ्यास पूर्ण झाल्यावर (४ त्या वर्षानंतर) आमचे गुणवंत विद्यार्थी युरोपियन युनियनमध्ये जर्मनी, पोलंड, लाटविया, फिनलंड, नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क विद्यार्थी विनिमय (Student Exchange) कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात. मी भारतीय विद्यार्थ्यांना इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये करिअर घडविण्यासाठी प्रोत्साहित करतो "

श्रेया साळवी ही तिसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी म्हणते "मी रशिया आणि इतर देशांच्या अनेक विद्यापीठांची तुलना केली, पण मला वाटते की मी योग्य निर्णय घेतला आहे. आमचे शिक्षक आमची अतिशय चांगली तयारी करून घेत आहेत."

अमेरिकेत शिकायला घाबरू नका, या आहेत ईझी स्टेप्स

मुंबईचे प्रदीप सरदार म्हणतात," माजी मुलगी सोनाली अतिशय खुश आहे इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये. आम्हाला खात्री व विश्वास आहे कि ती एक चांगली डॉक्टर बनणार व देशाची सेवा करणार."

इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये एमबीबीएस प्रवेशासाठी www.akec.in वर लॉग इन करा तसेच पालकांचे व विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया पहा : www.youtube.com/akecindia 

Facebook: https://www.facebook.com/akecindia/
Instagram: https://www.instagram.com/akecindiaofficial/
Twitter: https://twitter.com/akecindia/

कौन्सिलिंगसाठी संपर्क : ए.के. एज्युकेशनल कंसल्टंट्स , नेहा क्रिस्टल, ३रा मजला, ज्ञानेश्वर पादुका चौक, शिवाजीनगर, पुणे, महाराष्ट्र.
तसेच महाराष्ट्राच्या मुंबई, ठाणे, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, जळगाव, नाशिक, अकोला, बुलढाणा, नंदुरबार, अहमदनगर, रत्नागिरी , सिंधुदुर्ग, रायगड मध्ये पालक-विध्यार्थी माहिती केंद्र आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: opportunity of MBBS career in immanuel kant baltic university