
PCMC Recruitment : पिंपरी चिंचवड महापालिकेत मोठी भरती, 66 जागा अन् 80 हजार रुपयांपर्यंत वेतन
PCMC Mega Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महापालिकेत नवीन पदभरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. ३१ मे २०२३ पर्यंत आहे.
रिक्त पदे व त्यांची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
एकूण रिक्त जागा ६६
रिक्त पदांची जागा आणि शैक्षणिक पात्रता
१) कनिष्ठ निवासी - ५६
शैक्षणिक पात्रता - मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण तसेच एमएमसी रजिस्टर अद्ययावत असणे आवश्यक.
२) CMO - ५
शैक्षणिक पात्रता - मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण तसेच एमएमसी रजिस्टर अद्ययावत असणे आवश्यक. संबंधित विभागात कामाचा अनुभव असणे आवश्यक.
३) वैद्यकीय अधिकारी (पोस्टमार्टेम सेंटर) - ३
शैक्षणिक पात्रता - मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवी उत्तीर्ण तसेच एमएमसी रजिस्टर अद्ययावत असणे आवश्यक.
४) ब्लड बँक BTO - २
शैक्षणिक पात्रता - मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस/ DCP पदवी उत्तीर्ण तसेच MD Path प्राधान्य. एमएमसी रजिस्टर अद्ययावत असणे आवश्यक.
परीक्षा फी नाही.
वेतन -
कनिष्ठ निवासी - ६४,५५१
CMO - ७५०००
वैद्यकीय अधिकारी (पोस्टमॉर्टेम सेंटर) - ७५०००
ब्लड बँक BTO - ७५००० ते ८०,०००
नोकरीचे ठिकाण - पिंपरी चिंचवड
अर्ज करण्याची पद्धत - ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३१ मे २०२३
अधिकृत संकेतस्थळ - www.pcmcindia.gov.in