पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ, जाणून घ्या सविस्तर

polytechnic
polytechnicsakal media

मुंबई : तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या (Polytechnic Diploma) कॉलेजमधील प्रथम वर्षाच्या डिप्लोमा प्रवेशासाठी (Diploma Admission) नोंदणी करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे दहावीनंतरच्या (SSC) प्रथम वर्ष पदविका तंत्रनिकेतन (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेसाठी आता विद्यार्थ्यांना 30 जुलैपर्यंत अर्ज करता येणार असून त्यानंतर पहिली गुणवत्ता यादी (Marksheet) 2 ऑगस्टला जाहीर केली जाणार असल्याची माहिती संचालनालयाकडून देण्यात आली. ( Polytechnic Diploma Admission Extended till 30 july-nss91)

दहावीच्या निकालअगोदरच तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी अर्ज करण्याची मुदत 23 जुलैपर्यंत होती. ही मुदत संपल्याने पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

polytechnic
CET: अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाची वेबसाईट बंदच, विद्यार्थी प्रतीक्षेत

संचालनालयाचे आवाहन

दरम्यान, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करताना प्रथम तंत्रशिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यांनतर ऑनलाईन अर्ज करीत आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करावे करावेत. मागील काही दिवसात अर्ज करू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही एक संधी उपलब्ध करून देण्यात आली असून विद्यार्थ्यानी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

7 ऑगस्ट रोजी गुणवत्ता यादी

नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी 2 ऑगस्टला जाहीर होणार आहे. 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान यावर आक्षेप स्वीकारले जाणार असून 7 ऑगस्ट रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

अधिक माहितीसाठी संकेतस्थळ : www.dtemaharashtra.gov.in

प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक

  • ऑनलाइन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी आणि अर्ज भरण्याची निश्चिती करणे : ३० जुलै

  • विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर तात्पुरत्या गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करणे : २ ऑगस्ट

  • तात्पुरत्या गुणवत्या याद्यांमध्ये तक्रार असल्यास त्या सादर करण्यासाठी मुदत : ३ ते ५ ऑगस्ट

  • अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे : ७ ऑगस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com