संवाद : सामाजिक कार्याची क्षेत्रे

आपण मागील लेखांतून सामाजिक कार्याची माहिती घेतली. आपण आज भारतातील सोशल वर्क प्रोफेशनल असोसिएशनचे विविध प्रकारांची माहिती घेणार आहोत.
Social Work
Social Worksakal
Summary

आपण मागील लेखांतून सामाजिक कार्याची माहिती घेतली. आपण आज भारतातील सोशल वर्क प्रोफेशनल असोसिएशनचे विविध प्रकारांची माहिती घेणार आहोत.

- प्रशांत भोसले

आपण मागील लेखांतून सामाजिक कार्याची माहिती घेतली. आपण आज भारतातील सोशल वर्क प्रोफेशनल असोसिएशनचे विविध प्रकारांची माहिती घेणार आहोत.

सामाजिक कल्याणकारी स्वयंसेवी संस्थांच्या संघटना

  • आंतरराष्ट्रीय सामाजिक कल्याण परिषद (ICSW)

  • भारतीय समाज कल्याण परिषद

  • नॅशनल असोसिएशन ऑफ प्रोफेशनल सोशल वर्कर्स इन इंडिया (NAPSWI), नवी दिल्ली

  • महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (MASWE)

  • इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ स्कूल ऑफ सोशल वर्क

  • आशिया-पॅसिफिक असोसिएशन फॉर सोशल वर्क एज्युकेटर्स (APASWE)

भारतातील व्यावसायिक सामाजिक कार्यकर्त्यांसाठी रोजगार क्षेत्रे

  • सरकारी एजन्सी/ विभाग/संस्था/ शासनाची स्वायत्त संस्था. इ

  • स्वयंसेवी संस्था, उद्योग, कॉर्पोरेट्स

  • विद्यापीठे आणि महाविद्यालये यासारख्या शैक्षणिक संस्था जिथे सामाजिक कार्य शिकवले जात आहे

  • विविध कल्याण मंत्रालये आणि विभाग

  • राज्य नागरी विकास संस्था/नगरपालिका/महामंडळे

  • जिल्हा/उपविभागीय रुग्णालये, विविध सामाजिक आणि विकास संशोधन केंद्रे

  • बाल दत्तक, व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्रे

सामाजिक कार्यकर्त्यासाठी आवश्यक कौशल्ये

  • प्रकल्प प्रस्ताव तयार करणे.

  • व्यवस्थापन माहिती प्रणाली तयार करणे.

  • प्रकल्प अंमलबजावणी आराखडा तयार करणे.

  • जिल्हा/राज्य/राष्ट्रीय स्तरावर प्रकल्पाचे व्यवस्थापन आणि समन्वय.

  • कार्यक्रम देखरेख आणि मूल्यमापन.

  • अहवाल लेखन आणि सादरीकरण.

  • मासिक योजना आणि बजेट तयार करणे.

  • भागधारक आणि भागीदार संस्था यांच्याशी समन्वय आणि संपर्क साधणे.

  • प्रशिक्षण, कार्यशाळा, सेमिनार आयोजित करणे.

  • माहिती शिक्षण संप्रेषण विकसित करणे.

  • दस्तऐवजीकरण आणि केस स्टडीज.

  • सुविधा आणि लोक एकत्रीकरण.

  • सकारात्मक कामाची वृत्ती.

  • सचोटी आणि प्रामाणिकपणा.

  • आंतरवैयक्तिक संप्रेषण कौशल्य आहे.

  • संगणकावर प्रावीण्य असणे.

  • सामुदायिक संसाधनांचे ज्ञान इ.

(लेखक समाजकार्य व आदिवासी विषयाचे संशोधक, अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com