परदेशी विद्यापीठ निवडताना काय गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, याची माहिती घेतली आहेच. एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे परदेशी विद्यापीठांमध्ये जाण्यासाठी कुठली पूर्व परीक्षा/एंट्रन्स असते का?
- ॲड. प्रवीण निकम
परदेशी विद्यापीठ निवडताना काय गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे, याची माहिती घेतली आहेच. एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे परदेशी विद्यापीठांमध्ये जाण्यासाठी कुठली पूर्व परीक्षा/एंट्रन्स असते का? याबरोबर इंग्रजी विषयासाठीची कोणती परीक्षा द्यावी लागते का? हे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि म्हणून सविस्तर विद्यापीठांबाबत समजून घेण्याआधी आजच्या आणि पुढच्या काही लेखांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी कुठली एंट्रन्स असते का? आणि त्याविषयी महत्त्वाची कुठली परीक्षा द्यावी लागते का? या दोन मुद्द्यांबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करू.
भारतातील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी काही प्रवेश पूर्व परीक्षा द्यावी लागते, त्या-त्या विषयानुसार परीक्षेचे स्वरूपही बदलत. त्याचबरोबर उच्च शिक्षणासाठी कुठलीही इंग्रजी या विषयाची वेगळी पात्रता परीक्षा घेतली जात नाही. त्यामुळे भारतातल्या विद्यापीठांमध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना अर्ज करता येईल, त्याच बरोबर त्या-त्या विषय आणि विद्यापीठाने निर्धारित केलेली पूर्व परीक्षा असल्यास ती देऊन त्या विद्यापीठ पात्रतेप्रमाणे प्रवेश घेता येतो.
परंतु, बहुतेक परदेशातील विद्यापीठात शिक्षण घ्यायचे असल्यास सहसा कोणती पूर्व परीक्षा नसते, याआधी आपण पाहिलेल्या प्रवेश प्रक्रियेप्रमाणे ऑनलाइन परीक्षा अर्ज, याआधी शिक्षण घेतलेल्या पदवीचे ट्रान्सक्रिप्ट्स, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि रेकंमोडशन लेटर्स या वरून अर्जाची छाननी होऊन प्रवेश निश्चित केला जातो. यासर्व गोष्टीत पात्र होऊन एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी तुमचा प्रवेश थांबवला जाऊ शकतो, ते म्हणजे इंग्रजी विषयाची आंतरराष्ट्रीय परीक्षा.
तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की, माझे पदवीच शिक्षण इंग्रजीमध्ये झाले असेल तर पुन्हा एकदा अशी परीक्षा का द्यावी लागते का? तर, बहुतांश विद्यापीठांमध्ये ज्या-ज्या देशांची नेटिव्ह भाषा ही इंग्रजी आहे त्या विद्यार्थ्यांना इंग्रजीची वेगळी परीक्षा द्यावी लागत नाही. ज्या-ज्या देशांमध्ये त्यांची नेटिव्ह भाषा ही इंग्रजी नाही तर सर्व देशातल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी संदर्भातली आंतरराष्ट्रीय मानांकन असलेली इंग्रजीची परीक्षा द्यावी लागते. प्रत्येक शैक्षणिक संस्था ठरवते की कोणत्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे प्रमाणपत्र प्रदान करावे लागणार नाही. बहुतांश विद्यापीठ खाली दिलेल्या इंग्रजी भाषेच्या चाचण्यांपैकी एक, दोन आणि कधीकधी तीन संस्थांची मानांकन इंग्रजी विषयातील ज्ञान जाणून घेण्यासाठी स्वीकारतात. (याविषयी पुढच्या भागात सविस्तर जाणून घेऊच)
IELTS Academic
TOEFL
PTE Academic
C१ Advanced (formerly known as CAE)
B२ First (formerly known as FCE)
या इंग्रजी भाषा चाचण्या विविध संस्थांमार्फत घेतल्या जातात त्यात थोडासा लक्षणीय फरक असतो. तुम्हाला यापैकी कोणत्या संस्थेची इंग्रजी मानांकन परीक्षा द्यायची याची खात्री नसल्यास, आधी आपण प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यापीठात कोणत्या संस्थेच इंग्रजी मानांकन स्वीकारले जाते याची माहिती घ्या.
विद्यापीठ एकापेक्षा अधिक मानांकन स्वीकारत असेल तर, या प्रत्येक इंग्रजी मानांकन पात्रता परीक्षेबद्दल, त्यासंस्थेच्या वेबसाइटवर जाऊन त्या विषयी अधिक माहिती घ्या. आपल्याला सोईस्कर वाटणारी परीक्षा द्या. परदेशी विद्यापीठात प्रवेश घेण्याच्या आपल्या तयारीमध्ये या इंग्रजी पात्रता परीक्षेचा कालावधी आपण निर्धारित करून प्रवेश अर्जा सोबत याची तयारी करणेही आवश्यक आहे. भेटू पुढील भागात याविषयी आणखीन माहितीसह...
(लेखक ‘समता सेंटर’ या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.