व्यावसायिक अभ्यासक्रमांना हवी एकसारखी प्रवेश प्रक्रिया! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Professional courses require uniform admission process decision of Aurangabad Bench Demand educational institutions pune
व्यावसायिक अभ्यासक्रमांना हवी एकसारखी प्रवेश प्रक्रिया!

व्यावसायिक अभ्यासक्रमांना हवी एकसारखी प्रवेश प्रक्रिया!

पुणे : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एकसारखी प्रवेश अथवा समुपदेशन प्रक्रिया राबविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. नुकतेच औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासनाला यासंबंधी १५ दिवसांत निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. सरकारनेही आता यासंबंधी जलद हालचाली कराव्यात अशी मागणी शिक्षण संस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. अभियांत्रिकी, कृषी, औषधनिर्माण असो की वैद्यकीय प्रवेश, प्रत्येकासाठी प्रवेश प्रक्रिया वेगवेगळी राबविली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

पसंतीच्या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया उशिरा असल्यास निर्णय घेण्यास अडचणी निर्माण होतात. याचीच दखल घेत असोसिएशन ऑफ दि मॅनेजमेंट ऑफ अन ऐडेड इन्स्टिटयूटस इन रूरल एरिया ही संस्था राज्य सरकारशी मागील तीन वर्षांपासून चर्चा करत आहे. संघटनेचे अध्यक्ष रामदास झोळ म्हणतात, ‘‘शासनास सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया एकसारखी करण्याबाबत निवेदन दिलेले होते. परंतु,मागील तीन वर्षांपासून शासनाने याबाबत कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळे विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांचे नुकसान होत होते. खंडपीठाने शासनाला सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत संघटनेने दिलेल्या वरील सर्व पत्राचा विचार करून १५ दिवसाच्या आत निर्णय घेण्यास सांगितले आहे. व शासनाने घेतलेला निर्णय संघटनेला सात दिवसाच्या आत कळविण्यास सांगितलेला आहे.’’

अशा आहेत मागण्या..

  • सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश फेरी एकाच वेळेस समुपदेशक फेरी सह राबविण्यात यावी.

  • पदविका व पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची अंतिम तारीख, तसेच इयत्ता बारावी नंतरच्या सर्व अभ्यासक्रमांची प्रवेशाची अंतिम तारीख एकच असावी

  • बारावी नंतरच्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या अंतिम गुणवत्ता यादी तयार झाल्यावर त्यानंतर चे प्रवेश प्रक्रियेतील सर्व टप्पे एकाच वेळी घ्यावेत

  • इतर राज्यांप्रमाणे अंतिम फेरीत सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात यावी.

आकडे बोलतात..

  • राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटींची संख्या ः १५

  • २ मे २०२२ पर्यंत नोंदणी करणाऱ्या

  • विद्यार्थ्यांची संख्या ः १० लाख ८१ हजार ३६०

  • बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारे विद्यार्थी : सरासरी १२ टक्के

Web Title: Professional Courses Require Uniform Admission Process Decision Of Aurangabad Bench Demand Educational Institutions Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top