पुण्यातल्या अभ्यासकाच्या पाठपुराव्याला यश; निर्मळ हिंदीत 'ळ'ला मिळाले स्थान

India government give permission to use two different pronunciation of L in hindi
India government give permission to use two different pronunciation of L in hindi

पिंपरी : लोणावळा, खंडाळा, वरळी, बेळगाव, टिळक, बाळासाहेब असे टळ'चा समावेश असलेले शब्द हिंदीत 'ल' वापरून लिहिलेले दिसतात. त्यांचा उच्चारही लोणावला, खंडाला, वरली, बेलगाव असा केला जातो. आता त्यांच्या मुळरुपात अर्थात "ळ' या मुळाक्षरासह हिंदीतही दिसणार आहेत. यासाठी रावेत येथील भाषा अभ्यासक प्रकाश निर्मळ यांनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश मिळाले असून केंद्र सरकारच्या हिंदी विभागाने 'ळ'च्या वापराबाबतचे परिपत्रक रेल्वे, बॅंकांसह सर्व सरकारी कार्यालयांना पाठविले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हिंदीमध्ये 'ळ'चा वापर व उच्चार असताना 'ल'चा वापर केला जातो. तो "ळ'च करण्यात यावा, यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचा राजभाषा विभाग, उच्च शिक्षण मंत्रालयाचा हिंदी विभाग, प्रसारण मंत्रालय, प्रधानमंत्री कार्यालय, राष्ट्रपती व राज्यपाल यांच्यासह विविध भाषांमधील विद्वान आणि महाराष्ट्रातील विविध राजकीय नेते यांना वारंवार पत्र लिहून, फोन करून व प्रत्यक्ष भेटीद्वारे निर्मळ यांनी सातत्याने पाठपुरावा केला. विविध लेख व व्याख्यानातून राजभाषा हिंदीमध्ये "ळ' ऐवजी "ल'चा वापर करणे चुकीचे असल्याचे पुराव्यांसह पटवून दिले. आता त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून हिंदीतही "ळ'चा वापर होणार आहे.

निर्मळ म्हणाले, "हिंदीत "ळ'चा उच्चार असताना "ल'चा वापर केला जात होता. तो "ळ'च करण्यात यावा, यासाठी गेल्या वर्षापासून केंद्र सरकारच्या हिंदी विभागाकडे यांनी पाठपुरावा सुरू होता. "ळ' अक्षर राजभाषा हिंदीच्या परीवर्धित वर्णावलीत स्वीकृत केले आहे, हा अतिशय ऐतिहासिक निर्णय असून यामुळे रेल्वे, बॅंका सर्व केंद्र सरकारी कार्यालयांना यापुढे "ळ' युक्त स्थानिक नावांत बदल करता येणार नाही. "ळ' ऐवजी "ल' लिहिणे केंद्र सरकारच्या हिंदी विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचा भंग ठरणार आहे.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

निर्मळ यांचा दावा 

हिंदीचा उगम असलेली संस्कृत; हिंदीला मिळणारे राजस्थानी, हरयानवी, गढवाली, कुमायुणी, नेमाडी प्रवाह; दाक्षिणात्य कन्नड, तेलगू, मल्याळम व तमीळ; पश्‍चिमेकडील राज्यांची मराठी, कोकणी, गुजराथी; दक्षिण पूर्वेतील ओडिया अशा 14 भाषांत "ळ' आहे. तरीही या वर्णाची उपेक्षा करणे चूक आहे. हिंदी ही उच्चार प्रधान असून राजभाषा म्हणून सर्व समावेशक असणे गरजेचे आहे. उर्दूने पहाडी लोकांच्या उच्चारणाबाबत दाखवलेल्या नकारात्मक भूमिकेमुळे उर्दूतून "ळ' व "ण' आणि खडी बोलीतून "ळ' नाहीसा झाला आहे. परंतु, अखिल भारतीय हिंदी म्हणजे केवळ खडी बोली नसून सर्वसमावेश भाषा आहे. "टिळक', "बाळासाहेब', "श्रवण बेळगोळ', "बेळगाव', "मल्याळम', "तमीळ' या भाषांचे नामांतर करणे जनभावनेला ठेच पोचवणारे आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हिंदीत "ळ' वर्ण नसता, तर इंग्रजीने "छ'साठी केलेल्या तरतुदीप्रमाणे हिंदीत तरतूद करायला हवी. मात्र, अशी कोणतीही तरतूद नसल्याचे हिंदी राजभाषा विभागाने सांगितले. त्यानंतर हा विषय उच्च शिक्षण विभागाकडे वर्ग केला. त्यांनी हिंदी भाषा लेखनात अशा प्रकारची तरतूद केली असल्याचे स्पष्टीकरण दिले. "ळ'चा हिंदीत उच्चार हा सर्व प्रादेशिक व राजभाषेचा विजय आहे. 
- प्रकाश निर्मळ, भाषा अभ्यासक, रावेत 

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे म्हणतात...
आपल्या मराठी व हिंदी सह बऱ्याच भाषा देवनागरी लिपीत आहेत. देवनागरी लिपीत ळ आहे. मग, हिंदी भाषिकांनी ळ चा वापर टाळला. त्याला अलिप्त ठेवले. प्रकाश निर्मळ यांनी पाठपुरावा करून ळ ला जीवंत ठेवले. अन्यथा हा वर्ण, मुळाक्षर लुप्त झाले असते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com