करिअरच्या वाटेवर : मरिन इंजिनिअरिंग

सागरी जहाजांमार्फत व्यापारात मर्चंट नेव्ही असे संबोधण्यात येते. आंतरखंडीय व आंतरदेशीय सागरी व्यापार हे अतिशय धाडसी व रोमांचकारी करिअर समजले जाते.
marine engineering
marine engineeringsakal
Summary

सागरी जहाजांमार्फत व्यापारात मर्चंट नेव्ही असे संबोधण्यात येते. आंतरखंडीय व आंतरदेशीय सागरी व्यापार हे अतिशय धाडसी व रोमांचकारी करिअर समजले जाते.

- राजेश ओहोळ

जहाज वाहतुकीमार्फत व्यापाराचा भारतीय अर्थव्यवस्थेतील वाटा अत्यंत मौल्यवान ठरतो. देशातील ९५ टक्के व्यापार समुद्राद्वारे होत आहे. विकसनशील देशांच्या यादीत भारताकडे व्यापारी जहाजांचा ताफा सर्वाधिक असून जहाजांद्वारे ८० लाख टन क्षमतेच्या मालाची वाहतूक होत आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सागरी मालवाहतुकीबरोबर मालाची जहाजांवर चढ-उतार सेवा, जहाज बांधणी व दुरुस्ती, दीपगृह सेवा, सागरी वाहतूक मनुष्यबळ प्रशिक्षण आदी सोयी-सुविधा भारतीय सागरी वाहतुकीत अविभाज्य ठरतात.

सागरी जहाजांमार्फत व्यापारात मर्चंट नेव्ही असे संबोधण्यात येते. आंतरखंडीय व आंतरदेशीय सागरी व्यापार हे अतिशय धाडसी व रोमांचकारी करिअर समजले जाते. समुद्रामध्ये महिनोंमहिने जहाजांवरील प्रवासात विविध यंत्रणा अखंडितरित्या कार्यान्वित ठेवणे, त्याची देखभाल, दुरुस्ती, आपत्तीजन्य परिस्थितीत मार्ग काढणे आदी गोष्टी मरिन इंजिनिअरिंगमध्ये शिकविल्या जातात. मर्चंट नेव्हीला अत्यावश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती डायरेक्टर जनरल शिपिंग, भारत सरकार या विभागाद्वारे होते. सरकारी व अनेक मान्यताप्राप्त खासगी प्रशिक्षण संस्थांद्वारे मरिन ऑफिसर/इंजिनिअर बनता येते.

मरिन इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून मर्चंट नेव्हीत पुढील शाखांमध्ये करिअर करता येते.

१) नेव्हिगेशन -

नेव्हिगेशन अधिकारी हे जहाजांचे मार्गक्रमण बघतात. जहाजांवर माल चढविणे, उतरविणे तसेच आंतरराष्ट्रीय नेव्हिगेशन नियम व कायदे यांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी नेव्हिगेशन शाखा करते.

२) इंजिनिअरिंग -

जहाजाची संपूर्ण यंत्रणा सुस्थितीत व सुरळीत सुरू ठेवण्याची कामगिरी या शाखेतील तंत्रज्ञ व इंजिनिअर करतात.

३) रेडिओ व वायरलेस कम्युनिकेशन -

ही शाखा रेडिओ व वायरलेस यंत्रणेची देखभाल व वापर करते. जहाजाचा समुद्रातील ठावठिकाणा, खुशाली, संदेश, दळणवळण व अन्य गोष्टींची माहिती जहाज कंपनीला, बंदरांना व संबंधित यंत्रणेला कळविणे, हे काम या शाखेत होते.

शैक्षणिक पात्रता -

अ) बारावी शास्त्र (गणित, भौतिक व रसायनशास्त्र) उत्तीर्ण विद्यार्थी डेक कॅडेट (Deck cadet) म्हणून प्रवेश करू शकतात. डायरेक्टर जनरल, शिपिंग, भारत सरकार यांनी आखलेल्या व ठरविलेला अभ्यासक्रम व जॉब ट्रेनिंगनुसार क्षमता प्रमाणपत्र (compentency certificate) तीन वर्षांच्या ट्रेनिंगनंतर मिळविता येते. त्याकरिता कोणत्याही मान्यताप्राप्त ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा.

ब) डिग्री (मरिन इंजिनिअरिंग) किंवा बी. एस्सी (नॉटिकल सायन्स) उत्तीर्ण विद्यार्थी मर्चंट नेव्हीत थेट इंजिनिअर म्हणून नोकरी मिळवू शकतात. जे उमेदवार नुसते डिग्री मेकॅनिकल इंजिनिअरिंग उत्तीर्ण आहेत, त्यांना मरिन इंजिनिअरिंग चा एक वर्षाचा डायरेक्टर जनरल, शिपिंग मंजूर केलेला अभ्यासक्रम करणे जास्त फायदेशीर ठरते.

सरकारी प्रशिक्षण संस्था - केंद्र सरकारच्या पुढील प्रमुख चार प्रशिक्षण संस्थांमध्ये मरिन इंजिनिअरिंग, नॉटिकल सायन्स व मेरिटाइम सायन्स या शाखांचे अभ्यासक्रम राबविले जातात.

१) ट्रेनिंगशिप चाणक्य नवी मुंबई - येथे ३ वर्षांचा नॉटिकल सायन्समधील मुंबई विद्यापीठाचा बी. एस्सी पदवी अभ्यासक्रम राबविला जातो. डेक कॅडेट साठी एक वर्ष कालावधीचे पूर्व सागरी प्रशिक्षणही येथे मिळते.

२) मरिन इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (MERI) कोलकता - ही संस्था जावदपूर विद्यापीठाचा चार वर्ष कालावधीचा मरिन इंजिनिअरिंग अभ्यासक्रम देते.

३) मरिन इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट (MERI) मुंबई - मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी उमेदवारांसाठी एक वर्ष कालावधीचे मरिन इंजिनिअरिंग प्रशिक्षण येथे मिळते. त्याचबरोबर तीन वर्ष कालावधीची मुंबई विद्यापीठाचा मेरिटाइम सायन्सेस (meritime sciences) मध्ये बी. एस्सी अभ्यासक्रम येथे दिला जातो.

४) एल. बी. एस. कॉलेज ऑफ अ‍ॅडव्हान्स मेरिटाइम स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च मुंबई - सेवेमधील मरिन ऑफिसर यांना येथे प्रशिक्षण मिळते

संबंधित संकेतस्थळे - www.merical.ac.in,

www.dgshipping.com किंवा www.dgshipping.nic.in

एस.टी.सी.डब्ल्यू - ९५ (STCW-95) या आंतरराष्ट्रीय नियमांना धरून जागतिक दर्जाशी कोणतीही तडजोड करता भारतातील मरिन इंजिनिअरिंग अभ्यासक्रमामध्ये रचना केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेरिटाइम स्टडिज या स्वतंत्र केंद्रीय संस्थेची निर्मिती केली असून वरील चार संस्थांवर हिचे नियंत्रण ठेवण्यात आले आहे. या व्यतिरिक्त डायरेक्टर जनरल शिपिंग मान्यताप्राप्त १२८ च्या वर खासगी संस्था देशभरात पसरल्या आहेत. यामध्ये सागरी-पूर्व (Pre-sea) व सागरी-नंतर (Post-sea) प्रशिक्षण मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com