करिअरच्या वाटेवर : व्यवस्थापनशास्त्रातील संधी

कुठलेही कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्याकरिता प्रभावी व्यवस्थापनाचा अवलंब करणे प्रत्येक उद्योगाला अनिवार्य ठरते. व्यवस्थापन हा प्रत्येक कार्यपद्धतीचा अविभाज्य घटक आहे.
Opportunities in management
Opportunities in managementsakal
Summary

कुठलेही कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्याकरिता प्रभावी व्यवस्थापनाचा अवलंब करणे प्रत्येक उद्योगाला अनिवार्य ठरते. व्यवस्थापन हा प्रत्येक कार्यपद्धतीचा अविभाज्य घटक आहे.

- राजेश ओहोळ

कुठलेही कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्याकरिता प्रभावी व्यवस्थापनाचा अवलंब करणे प्रत्येक उद्योगाला अनिवार्य ठरते. व्यवस्थापन हा प्रत्येक कार्यपद्धतीचा अविभाज्य घटक आहे. नियोजन आयोजन, मनुष्यबळ विकास, प्रभावी नेतृत्व आणि नियंत्रण या पाच कार्यातील सुसूत्रीकरणावर व्यवस्थापनाची कार्यक्षमता ठरवली जाते.

अगदी छोट्यातला छोटा लघुउद्योग, संस्था, व्यवसाय, कार्यक्रमापासून ते बहुराष्ट्रीय मोठे उद्योग, कंपन्या, संस्था चे यश हे कार्यक्षम व्यवस्थापनावर अवलंबून राहते. जागतिकीकरणाच्या वातावरणात व्यवस्थापन शास्त्रातील नव्या पद्धती, नवे तत्त्वे/सिद्धान्त यांनी व्यवस्थापन प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवून आणले आहेत. परिणामी, सर्व क्षेत्रांतील व्यवस्थापकांना जागतिक दर्जाच्या व्यवस्थापनशास्त्राशी मिळते जुळते किंवा त्याचा अवलंब करणे कालसापेक्ष बनले आहे.

स्थित्यंतराचा विचार

आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक घटकांचा उद्योगांवरील परिणाम हा नेहमीच चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय उद्योग किंवा कंपन्यांना जागतिक बाजारपेठ डोळ्यांसमोर ठेऊन त्या त्या व्यवसायाला लागू होणारी स्वतंत्र व विशेष व्यवस्थापन प्रणाली विकसित करणे गरजेचे होऊ पाहत आहे. सामान्येतर यश मिळविण्याकरिता अस्तित्वात असणाऱ्या कार्यपद्धती किंवा रचनेला पेलवणारे व लागू होणारे बदल सर्वांना स्वीकारावे लागत आहेत. बदल किंवा स्थित्यंतर ही हळूवार, परंतु सातत्याने चालणारी प्रक्रिया असावी लागते. बदल हा संस्थेतील सर्व मनुष्यबळावरच्या इच्छाशक्तीवर अवलंबून राहतो. त्यामुळे मनुष्यबळ विकासास विशेष महत्त्व दिले जाते. अशा व इतर सर्व बाबींचा विचार होऊन व व्यवसायातील सर्व टप्प्यांवरील व्यूहरचना दोषरहित बनविण्याचा प्रयत्न होत असतो.

कार्यानुसार बदल

कोणतीही योजना निर्णयाविना अस्तित्वात येऊ शकत नाही. निर्णय उपलब्ध पर्यायांमधून एक घेतला जातो. अपेक्षित उद्दिष्ट्ये साध्य करण्याकरिता वापरण्यात येणाऱ्या पद्धती अनेक आहेत. संस्था व त्यातील कार्यानुसार त्या बदलत असतात. व्यवस्थापनशास्त्रातील बजेटिंग, कॉस्ट अकाउंटिंग, नेटवर्क प्लॅनिंग अँड कंट्रोल आदी पद्धतींचा यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. उत्पादन वेग, प्रभावीपणा व कार्यक्षमता या तीन घटकांद्वारे व्यवस्थापनाचे मोजमाप ठरते. या घटकांना संतुलित ठेवण्यासाठी प्रत्येक व्यवस्थापन प्रयत्नशील राहते.

अत्याधुनिक व्यवस्थापन प्रणालीची माहिती व त्यातील प्रशिक्षण कार्यक्रम सर्वत्र उपलब्ध आहेत. प्रगतशील संस्था, प्रशिक्षण व उच्च शिक्षणास वेळोवेळी स्वतःच्या मनुष्यबळाला प्रोत्साहित करत आहेत. कार्यानुसार प्रशिक्षण अभ्यासक्रमांना सर्वत्र मागणी वाढलेली दिसते. उत्पादन, सेवा व व्यापार या तीन मुख्य भागांमध्ये सर्व उद्योगांना विभागले गेले आहे. अशा सर्व ठिकाणी प्रशासकीय व्यवस्थापकीय नेतृत्व ही जबाबदारीची बाब ठरते. त्यामुळे व्यवस्थापनशास्त्र शिक्षणधारकांची मागणी वाढलेली आहे.

पदवी किंवा पदविका शिक्षणानंतर व्यवस्थापनशास्त्रातील शिक्षण देशातील बहुसंख्य सरकारी विद्यापीठे, आयआयएम, आयआयटी अभिमत विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे.

फायनान्स, एचआर, मटेरिअल मार्केटिंग अशा व इतर शाखांमध्ये एम.बी.ए किंवा तत्सम पदव्युत्तर शिक्षणास प्रवेश त्या त्या संबंधित प्रवेश परीक्षेद्वारे मिळतो. व्यवस्थापकीय दर्जाच्या नोकऱ्यांसाठी व्यवस्थापनशास्त्र शिक्षण ही वाढीव पात्रता सर्व पदवी किंवा पदविकाधारकांनी मिळविणे काळाची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com