
विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये कोणते ट्रेंड सुरू आहेत हे माहिती असावे व त्याचबरोबर निवडलेल्या अभ्यासक्रमातील नवीनतम गोष्टींची माहितीही त्याच्याकडे असावी.तुमच्या क्षेत्रातील सर्व गोष्टींचा मागोवा घेणे
तयारी आणि नियोजन हे यशस्वीरीत्या परदेशात शिकायला जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठीचे दोन महत्त्वाचे पैलू आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांने निवडणार असलेल्या अभ्यासक्रमासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या याचे मूल्यांकन करणे गरजेचे असते. ही तयारी विद्यार्थ्याने अभ्यासक्रमासाठी परदेशात जाण्याआधी दोन वर्षे करणे तितकेच आवश्यक आहे. म्हणजेच विद्यार्थ्याने पदवी घेण्याआधी दोन वर्षे प्रोफाइल बिल्डिंग म्हणजे काय, हे समजावून घेतले पाहिजे व त्यासाठी आवश्यक पावले टाकण्यास सुरवात केली पाहिजे.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला कोणत्याही अभियांत्रिकी शाखेतील पदव्युत्तर शिक्षणासारखे तांत्रिक शिक्षण घ्यायचे असल्यास आवश्यक ऐच्छिक अभ्यासक्रम कोणते व भविष्यातील शिक्षणासाठी कोणते प्रकल्प निवडावेत, हे दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. प्रत्येक वर्षी चांगले मार्क मिळवत राहणे ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट ठरते. विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमध्ये कोणते ट्रेंड सुरू आहेत हे माहिती असावे व त्याचबरोबर निवडलेल्या अभ्यासक्रमातील नवीनतम गोष्टींची माहितीही त्याच्याकडे असावी. तुमच्या क्षेत्रातील सर्व गोष्टींचा मागोवा घेणे, संशोधन निबंध पाहणे व सायन्स डायरेक्टसारख्या प्रकाशनांचे वाचन करणे आवश्यक आहे. शिक्षण घेतानाच विख्यात विद्यापीठांचे ऑनलाइन अभ्यास पूर्ण करावेत. कोर्सेरा आणि उदेमी या स्रोतांची वापर करणे अधिक शहाणपणाचे ठरेल, अनेक विद्यार्थी आता टेक्नो-मॅनेजेरिअल अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेतात. हाही योग्य निर्णय ठरू शकतो, कारण तेथे विपुल तांत्रिक ज्ञान असलेले शिक्षण असतात व त्यांना उद्योगविषयक दृष्टीही असते. असे अभ्यासक्रम करताना तुम्हाला योग्य अशा उद्योगक्षेत्रातील कामाचा अनुभव घेणेही उचित ठरते. तुम्ही दांडगे शैक्षणिक व व्यावसायिक संपर्क निर्माण करणे आवश्यकच असते.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
थोडक्यात, विद्यार्थ्यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण करीत असल्यापासूनच उत्तम सॉफ्ट स्किल्स विकसित केले पाहिजेत व त्याला सादरीकरणाची जोडही दिली पाहिजे. हा पाया तयार झाल्यावर तुम्ही परदेशात जाण्याच्या अर्जासाठीच्या आवश्यक गोष्टींकडे वळू शकता.