esakal | परदेशात शिकताना... : विद्यापीठात पोचल्यानंतर...

बोलून बातमी शोधा

Foreign Education

परदेशात शिकताना... : विद्यापीठात पोचल्यानंतर...

sakal_logo
By
राजीव बोस

व्हिसा प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी त्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी उड्डाण करण्यास सज्ज होतो. विद्यार्थ्यांनी त्यांच्या विद्यापीठाच्या जवळच्या अंतरावर असलेल्या विमानतळावरच उतरण्याचा सल्ला मी देतो, कारण विद्यार्थ्यांना विमानतळावर उतरल्यावर इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण करावी लागते. ‘एफ १’ व्हिसावर प्रवास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे अमेरिकेत प्रवेश करण्यासाठीचे कारण शिक्षण घेणे आहे, हे सिद्ध करावे लागते. तुम्ही एकदा विद्यापीठात पोचल्यानंतर व अपेक्षित कागदपत्रे सादर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यावर बहुतांश विद्यापीठे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक कौन्सिलर पुरवतात. याचे कारण, ही सर्व प्रवेश प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी नवी असते व ती परदेशातील वातावरणात असते.

त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वातावरणाशी जुळवून घेणे अवघड बनते व त्यामुळे तेथे राहण्यात काही अडचणींचाही सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांना घर कसे निवडावे, स्टेशनरी व पुस्तके कोठून घ्यावी व दररोज लागणाऱ्या किराण्याची सोय कोठून करावी यासाठी मदत व सल्ल्याची गरज लागते. तुमच्यासाठी दिलेले कौन्सिलर तुम्हाला या सर्व समस्या सोडविण्यासाठी मदत करतो, संबंधित वस्तू कशा निवडाव्यात याचा सल्ला देतो, त्याचबरोबर स्थानिक प्रशासनाची धोरणे काय आहेत, आर्थिक मदत कोठून मिळू शकते या गोष्टींचीही माहिती देतो. त्याचबरोबर तुम्हाला दैनंदिन जीवनात काही समस्या आल्यास त्या सोडविण्यासाठीही मदत करतो. त्यामुळे तुमच्या या कौन्सिलरबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करणे तुमच्या फायद्याचे ठरते.

हवामानाशी जुळवून घ्या

परदेशातील हवामान भारतातील हवामानाच्या तुलनेत खूपच विषम आणि तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते. अशा हवामानात नक्की कसे कपडे परिधान करावेत याबाबत अंदाज घेणे तुम्हाला कठीण जाऊ शकते. तुम्ही विद्यापीठात प्रवेश घेतानाच तुम्ही आवश्यक कपडे, जसे की हिवाळी कोट किंवा ओव्हर कोट खरेदी करणे श्रेयस्कर ठरते. सर्वच विद्यापीठांमध्ये आवश्यक असलेले एअर कंडिशनर किंवा हिटर्स बसवलेले असतात. तुम्हाला विद्यापीठ ते तुमच्या अपार्टमेंटपर्यंतचा प्रवास करताना हवामानाला योग्य कपडे गरजेचे असतात. बहुतांश विद्यापीठांत जाण्या-येण्यासाठी विपुल प्रमाणात बस आणि ट्रेन सेवा उपलब्ध असतात आणि परदेशी विद्यार्थी त्याचा चांगला उपयोग करतात...