परदेशात शिकताना... : प्रवेश घेण्यापूर्वी...

अमेरिकेमध्ये शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या दोन फेऱ्या असतात. त्या ‘स्प्रिंग’ आणि ‘फॉल’ या नावांनी ओळखल्या जातात. त्यातील ‘फॉल’ ही मोठी प्रवेशप्रक्रिया असते.
studying abroad
studying abroadSakal

अमेरिकेमध्ये शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज करण्याच्या दोन फेऱ्या असतात. त्या ‘स्प्रिंग’ आणि ‘फॉल’ या नावांनी ओळखल्या जातात. त्यातील ‘फॉल’ ही मोठी प्रवेशप्रक्रिया असते. फॉलसाठीची प्रवेशप्रक्रिया ९ महिने आधीच सुरू केली जाते. याचाच अर्थ, ज्यांना ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२२ या शैक्षणिक वर्षाला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी प्रवेशप्रक्रिया ऑक्टोबर २०२१मध्ये पूर्ण करणे अपेक्षित असते. यामुळे सर्वांत आधी प्रवेश घेणे शक्य होते किंवा एखाद्या स्कॉलरशीपसाठी अर्ज करायचा असल्यास आधीच घेतलेल्या प्रवेशाचा उपयोग होते.

प्रवेशप्रक्रियेसाठी अर्ज करताना दोन गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. तुम्ही योग्य त्या विद्यापीठाची निवड करणे आणि तुमचे प्रोफाईल सर्वोत्तम पद्धतीने सादर करणे. प्रोफाईलमध्ये योग्य रिझ्युमे तयार करणे आणि तुम्हाला प्रवेश नक्की कोणत्या कारणासाठी हवा आहे याचा योग्य ड्राफ्ट तयार करणे यांचा समावेश होतो. विद्यार्थ्यांनी या दोन गोष्टी करण्यासाठी भरपूर वेळ द्यावा व त्या खूप विचारपूर्वक पूर्ण कराव्यात. बहुतांश विद्यापीठे विद्यार्थ्यांच्या प्रोफाईल सादर करण्यामागील दृष्टिकोन काय आहे, हे पाहतात. त्यामुळे तोपर्यंतच्या शिक्षणातील चांगले मार्क अत्यंत महत्त्वाचे ठरतात. त्याच्या जोडीला पूरक असे संशोधन केले असल्यास किंवा योग्य असा प्रकल्प केला असल्यास किंवा संबंधित अभ्यासक्रमासंदर्भात एखादा वेगळा कोर्स केला असल्यास त्याचा प्रवेशासाठी खूप मोठा फायदा होऊ शकतो.

प्रवेशप्रक्रियेतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा व्हिसा मिळविण्यासाठीची प्रक्रिया असते. विद्यार्थी आय२० कागदपत्रे मिळाल्यानंतर एफ१ व्हिसासाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया अभ्यासक्रम सुरू होण्याअगोदर दोन महिने पूर्ण करणे अपेक्षित असते. म्हणजेच, अभ्यासक्रम ऑगस्ट महिन्यात सुरू होणार असल्यास व्हिसाची प्रक्रिया मे महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असते. असे केल्याने विद्यार्थ्याला प्रवासाचे आरक्षण, राहण्याची सोय व कोर्ससाठी रजिस्ट्रेशन करणे या पुढील प्रक्रियांसाठी पुरेसा वेळ मिळतो. सध्याच्या कोरोना महामारीमुळे या प्रक्रियेत काही काळासाठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र, या परिस्थितीत विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा व व्हिसाच्या ताराखांवर लक्ष ठेवावे. अमेरिकेच्या एम्बसीने परिस्थिती निवळल्यानंतर व्हिसा देण्याची प्रक्रिया सुलभ करण्याचे आश्वासन भारतीय विद्यार्थ्यांना दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com