परदेशात शिकताना : विद्यापीठाच्या ‘कुंडली’त काय पाहाल?

विद्यापीठाची निवड करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या विविध पैलूंचा खोलवर अभ्यास करणेही तितकेच गरजेचे असते.
Foreign University
Foreign UniversitySakal

परदेशात पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणे ही मोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना स्वतःसाठी योग्य अभ्यासक्रम निवडणे व त्याचबरोबर योग्य विद्यापाठीची निवड करणे हा त्यांच्या करिअरच्या दृष्टिने सर्वांत महत्त्वाचा निर्णय ठरतो. अमेरिकेत तब्बल दोन हजार देणारी विद्यापीठे आहेत, याचा विचार केल्यास ही फारच किचकट प्रक्रिया ठरते. तुमच्यासाठी योग्य अभ्यासक्रम निवडताना तो तुमच्या प्रोफाईलशी तंतोतंत जुळेल व त्याचबरोबर तुमच्या भविष्यातील योजनाही त्यातून साध्य होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. तुम्ही स्वतः काही संशोधन केले असल्यास किंवा तुमचा एखादा रिसर्च पेपर प्रसिद्ध झाला असल्यास तुम्ही संशोधनाशी संबंधित एखादा अभ्यासक्रम निवडायला गेल्यास याचा तुमच्या प्रवेशासाठी चांगला उपयोग होतो. तुम्ही तुमचे सॉफ्टवेअरमधील स्किल्स सातत्याने अपडेट ठेवणेही तेवढेच आवश्यक असते.

त्याचप्रमाणे विद्यापीठाची निवड करताना विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या विविध पैलूंचा खोलवर अभ्यास करणेही तितकेच गरजेचे असते. यामध्ये विविध संशोधनांतून पुढे आलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यापीठाचे रॅंकिंग. त्यासाठी विद्यार्थी विशेषतः यूएस न्यूज रेटिंग तपासतात. त्यातून तुम्हाला विद्यापीठाची आजपर्यंतची ओळख नक्की कशी आहे, याचा सर्वसाधारण अंदाज करता येतो, मात्र विद्यार्थ्यांनी त्याबरोबरच आणखी काही मुद्यांचा अभ्यास करणे आवश्यक असते.

विद्यापीठाच्या वेबसाइटवर तुम्हा विद्यार्थी-शिक्षक प्रमाण नक्की कसे आहे, शिकवण्याचा दर्जा आणि विद्यापीठ देत असलेल्या आर्थिक मदतीचे स्वरूप कसे आहे, कोणत्या देशातील विद्यार्थ्यांची संख्या किती आहे, विद्यापीठाकडे कोणत्या पायाभूत सुविधा आहेत, संशोधनाची कोणती संसाधने उपलब्ध आहेत आणि कॅम्पसचे वातावरण नक्की कसे आहे याची माहिती मिळते. त्याचबरोबर विद्यापीठाजवळ असलेली शहरे कोणती आहेत व तेथे कामाचा अनुभव घेण्याची वेळ आल्यास किती संधी आहे हे पाहणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या प्रोफाइल पेजेसमध्ये तुम्हाला पदव्युत्तर शिक्षणानंतर कमाईच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत व त्यावर माजी विद्यार्थ्यांनी टाकलेले रिव्ह्यूज पाहता येतात.

हे सर्व पाहिल्यानंतर विद्यापाठीत शिकवणाऱ्या प्राध्यापकांच्या प्रोफाइलचा, त्यांच्या संशोधनाचे विषय कोणते आहेत याचा व ते भविष्यात तुम्हाला कोणत्या संधी देऊ शकतात याचा शोध घेणेही तेवढेच आवश्यक आहे. याचे कारण तुम्हाला भविष्यात मिळणाऱ्या एखाद्या मोठ्या संधीची शिफारस तुम्हाला शिकवणाऱ्या प्रोफेसर्सकडूनच मिळण्याची शक्यता मोठी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com