परदेशात शिकताना... : अमेरिकेत अंडर ग्रॅज्युएशन

अमेरिकेमध्ये अंडर ग्रॅज्युएटचे शिक्षण घेणे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरतो व त्यासाठी विविध गोष्टींचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असते.
Abroad Education
Abroad EducationSakal

अमेरिकेमध्ये अंडर ग्रॅज्युएटचे शिक्षण घेणे हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय ठरतो व त्यासाठी विविध गोष्टींचा सखोल अभ्यास करणे गरजेचे असते. पालकांसाठी सर्वांत मोठा विचार त्यांच्या पाल्याच्या वयाचा असतो. त्यांच्या पाल्याने केवळ बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असते आणि त्यांना कोणता अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, याबद्दल खूपच कमी माहिती असते. त्याचबरोबर पाल्य कायमच आपल्या घरात, आई-वडिलांच्या छत्रछायेत राहिला असल्याने त्याला परदेशात एकटे राहणे अत्यंत अवघड जाऊ शकते. तेथील अत्यंत वेगळ्या संस्कृतीशी जुळवून घेणे हेही त्यांच्यासाठी आव्हान ठरू शकते. त्याचप्रमाणे त्याने आजपर्यंत शिकलेल्या अभ्यासक्रमापेक्षा परदेशातील अभ्यासक्रम पूर्णपणे वेगळा असतो. तेथील अभ्यासक्रमामध्ये प्रॅक्टिकलला अधिक महत्त्व दिले जाते व तुमच्यातील संज्ञापनातील कौशल्यांचा (कम्युनिकेशन स्किल्स) अधिकाधिक वापर करण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते.

असे असले तरीही, अनेक भारतीय विद्यार्थी हे शैक्षणिक व सांस्कृतिक आव्हान लिलया पेलत आपल्यामधील अंगभूत कौशल्ये दाखविण्यात यशस्वी ठरतात. तेथील अभ्यासक्रमांमध्ये विविधता असल्याने विद्यार्थ्यांना त्यांना नक्की कोणते करिअर मानवणार आहे यासाठीच्या विविध शक्यता तपासून पाहता येतात. अमेरिकेतील अंडर ग्रॅज्युएटचा अभ्यासक्रम ४ वर्षांचा असतो. त्यांना फ्रेशमन, सोफोमोअर, ज्युनिअर आणि सिनिअर इयर्स म्हणून संबोधले जाते. फ्रेशमन आणि सोफोमोअर या वर्षांत साहित्य, गणित, मूलभूत विज्ञान, इतिहास, भूगोल आणि कला अशा विषयांतील सर्वंकष ज्ञान दिले जाते. प्रत्येक वर्षी विद्यार्थी सुमारे ४० क्रेडिट्स पूर्ण करतो व १२० क्रेडिट्स मिळाल्यानंतर तो पदवी प्राप्त करतो. शेवटच्या दोन ज्युनिअर आणि सिनिअर या वर्षी विद्यार्थी एका विशिष्ट विषयात प्रावीण्य मिळवतात. जसे, इंजिनिअरिंग ते प्युअर सायन्सेस, विविध भाषा किंवा अकाउंट्ससारख्या कॉमर्सशी संबंधित शाखा. हा अभ्यास अधिक खोलात शिकण्यासाठी विद्यार्थी एमएससाठी प्रवेश घेऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com