AIIMS Job | एम्समध्ये नोकरीची मोठी संधी; ७० हजारांपर्यंत मिळणार पगार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

AIIMS Job

AIIMS Job : एम्समध्ये नोकरीची मोठी संधी; ७० हजारांपर्यंत मिळणार पगार

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) देवघर यांनी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

त्यानुसार संस्थेत विविध पदांवर भरती केली जाणार आहे. ज्यासाठी उमेदवार लवकरच अर्ज करू शकतील. अधिकृत साइट aiimsdeoghar.edu.in वर जाऊन उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतील. (recruitment in AIIMS hospital )

पहिल्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया 10 जूनपासून सुरू होईल आणि 17 जून रोजी संपेल. तर दुसऱ्या फेरीसाठी अर्ज प्रक्रिया १५ जुलैपासून सुरू होऊन २२ जुलैला संपेल. तिसर्‍या फेरीचे अर्ज १० सप्टेंबरपासून सुरू होणार असून १७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत. चौथ्या फेरीची प्रक्रिया 10 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

रिक्त जागांचा तपशील

या भरती मोहिमेद्वारे प्राध्यापकांच्या २६ पदांवर, अतिरिक्त प्राध्यापकाच्या १६ पदे, सहयोगी प्राध्यापकाच्या ११ पदे, सहयोगी प्राध्यापक (रीडर) कॉलेज ऑफ नर्सिंगचे १ पद आणि सहायक प्राध्यापकाच्या १९ पदांवर भरती करण्यात येणार आहे.

वयोमर्यादा

एम्स देवघरमधील प्राध्यापक आणि अतिरिक्त प्राध्यापक पदासाठी वयोमर्यादा ५८ वर्षांपेक्षा जास्त नसावी. असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ५० वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेल. या मोहिमेसाठी उमेदवारांना 3000 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट दिली जाईल.

तुम्हाला किती पगार मिळेल ?

प्रोफेसर, अतिरिक्त प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 37,000 ते 67,000 रुपये पगार दिला जाईल. सहाय्यक प्राध्यापक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 15,600 ते 39,100 रुपये पगार दिला जाईल.

टॅग्स :Recruitmentjob