Job Alert | या बँकेत मिळेल ८९ हजार रुपये पगार; लगेच करा अर्ज recruitment in bank of baroda | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Job Alert

Job Alert : या बँकेत मिळेल ८९ हजार रुपये पगार; लगेच करा अर्ज

मुंबई : बँक ऑफ बडोदाने १५७ पदांसाठी भरती सुरू केली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

बँक ऑफ बडोदाच्या C&IC विभागात स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी भरती करण्यात येत आहे. या मोहिमेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

या मोहिमेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मे २०२३ ही निश्चित करण्यात आली आहे. (recruitment in bank of baroda )

या भरती मोहिमेद्वारे एकूण १५७ पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये रिलेशनशिप मॅनेजरची ६६ पदे, क्रेडिट अॅनालिस्टची ७४ पदे आणि फॉरेन एक्स्चेंज अॅक्विझिशन आणि रिलेशनशिप मॅनेजरच्या १७ पदांचा समावेश आहे.

पात्रता

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कामाचा अनुभव असलेल्या कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, PG पदवी, संबंधित स्पेशलायझेशन डिप्लोमा असणे आवश्यक आहे. CA/CFA/CS/CMA असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा

अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय २४ ते ४२ वर्षे असावे.

वेतन

निवडलेल्या उमेदवारांना ६९ हजार १८० रुपये ते ८९ हजार ८९० रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अशी होईल निवड

या पदांसाठी उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी, मानसोपचार चाचणी, गट चर्चा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

टॅग्स :BankRecruitmentjob