Apprentice Job | सेंट्रल बँकेत ५ हजार जागांवर भरती; हजारो रुपये मिळणार पगार recruitment in central bank of india on 5000 apprentice posts job for graduates | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Apprentice Job

Apprentice Job : सेंट्रल बँकेत ५ हजार जागांवर भरती; हजारो रुपये मिळणार पगार

मुंबई : सेंट्रल बँक ऑफ इंडियाने अप्रेंटिस पदासाठी बंपर भरती काढली आहे. या भरती मोहिमेद्वारे ५ हजार जागांवर उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करण्याची क्षमता व इच्छा आहे, त्यांनी अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करावेत.

या पदांसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. कालपासून म्हणजेच २० मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ०३ एप्रिल २०२३ आहे. पदवीधर तरुणांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. (recruitment in central bank of india on 5000 apprentice posts) हेही वाचा - अदानी..हिंडेनबर्ग आणि भविष्य.... 

कोण अर्ज करू शकतो ?

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी उत्तीर्ण केलेली असावी. २० ते २८ वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

किती फी भरायची आहे ?

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, PWBD उमेदवारांना ४०० रुपये शुल्क भरावे लागेल. SC, ST आणि महिला उमेदवारांना अर्जासाठी ६०० रुपये भरावे लागतील. इतर सर्व उमेदवारांना अर्जासाठी ८०० रुपये भरावे लागतील.

तुम्हाला किती पगार मिळेल ?

या पदांद्वारे देशभरातील अनेक राज्यांमध्ये भरती केली जाणार आहे. उमेदवार ज्या शाखेत निवडला जाईल त्यानुसार वेतन मिळेल. उदाहरणार्थ, ग्रामीण आणि निमशहरी शाखेसाठी वेतन १० हजार रुपये आहे. शहरी शाखेसाठी पगार १५ हजार रुपये आहे. त्याचप्रमाणे मेट्रो शाखेसाठी दरमहा २० हजार रुपये पगार आहे.

या वेबसाइटवरून अर्ज करा

सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शिकाऊ पदासाठी फक्त ऑनलाइन अर्ज करता येतो. यासाठी, उमेदवारांना सेंट्रल बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, ज्याचा पत्ता आहे – centerbankofindia.co.in.

या पदांसाठी उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीद्वारे केली जाईल. लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ प्रकारची असेल.

टॅग्स :BankingRecruitmentjob