JNU Job | १०वी-१२वी उत्तीर्ण आणि पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

JNU

JNU Job : १०वी-१२वी उत्तीर्ण आणि पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी

मुंबई : १०वी, १२वी आणि पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काही काळापासून सुरू असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च आहे.

ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज भरायचे आहेत, त्यांनी विहीत नमुन्यात वेळेत अर्ज करावेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत, ज्या अंतर्गत अनेक शिक्षकेतर पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे. (recruitment in JNU for non-teaching staff) हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

अर्जाशी संबंधित महत्त्वाची माहिती

  • या पदांसाठी अर्ज केवळ ऑनलाइनच करता येतील. यासाठी, तुम्हाला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या jnu.ac.in. या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

  • १८ फेब्रुवारीपासून अर्ज स्वीकारले जात आहेत आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १० मार्च २०२३ आहे.

  • या पदांसाठी अर्ज करण्याची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी आहे.

  • संबंधित क्षेत्रात आयटीआय डिप्लोमा असलेले १०वी, १२वी किंवा पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात.

  • किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे आणि कमाल वयोमर्यादा पोस्टनुसार बदलते.

  • आरक्षित वर्गाला सरकारी नियमांनुसार वयात सवलत मिळेल.

  • या पदांसाठी उमेदवारांची निवड परीक्षेचे अनेक टप्पे पार केल्यानंतर केली जाईल.

  • प्रथम लेखी परीक्षा, नंतर मुलाखत आणि शेवटी कागदपत्र पडताळणी होईल.

  • सर्व टप्पे पार करणाऱ्या उमेदवारांचीच निवड केली जाईल.

  • या पदांसाठी अर्ज करण्यासाठी सर्वसाधारण श्रेणीतील उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावे लागेल.

  • SC, ST, OBC, महिला प्रवर्ग आणि PWD प्रवर्गासाठी ६०० रुपये शुल्क भरावे लागेल.

  • या भरती प्रक्रियेद्वारे कनिष्ठ सहाय्यक, MTS, लघुलेखक, कुक, मेस हेल्पर, कार्य सहाय्यक आणि अभियांत्रिकी परिचर ही पदे भरली जातील.