RBI Vacancy | १०वी उत्तीर्णांना मिळणार रिझर्व्ह बँकेत नोकरी; परीक्षा देण्याचीही गरज नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RBI Vacancy

RBI Vacancy : १०वी उत्तीर्णांना मिळणार रिझर्व्ह बँकेत नोकरी; परीक्षा देण्याचीही गरज नाही

मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) फार्मासिस्ट पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांच्या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जाऊन अर्ज डाउनलोड करून भरू शकतो. (RBI Vacancy 2023)

या भरतीद्वारे एकूण २५ फार्मासिस्ट पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० एप्रिल आहे. यानंतर उमेदवारांना त्यांचा अर्ज भरता येणार नाही. (RBI Recruitment 2023) हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

रिक्त जागांचा तपशील

या RBI भरतीद्वारे एकूण २५ पदे भरली जातील.

महत्त्वाची तारीख

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी नोंद घ्यावी की अर्ज करण्यासाठी १० एप्रिलपर्यंतच वेळ देण्यात येईल.

शैक्षणिक पात्रता

फार्मासिस्ट पदांसाठी अर्ज करणार असलेल्या कोणत्याही उमेदवाराकडे मान्यताप्राप्त संस्थेचे १०वी उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवारांनी फार्मसीमध्ये डिप्लोमा असणेही आवश्यक आहे. (recruitment of 10th pass in reserve bank RBI pharmacist Recruitment 2023 )

निवड प्रक्रिया

फार्मासिस्ट पदांच्या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना त्यांची पात्रता, शिक्षण इत्यादींच्या आधारावर निवडले जाईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल. यासह, निवडलेल्या उमेदवारांसाठी वैद्यकीय तपासणी आणि कागदपत्रं पडताळणीची प्रक्रिया देखील केली जाईल.

अर्ज कुठे पाठवायचा ?

सर्वप्रथम अधिसूचनेत दिलेला फॉर्म डाउनलोड करा. त्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मदतीने फॉर्म भरा आणि प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भरती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – ४००००१ येथे पाठवा.