UPSC Job | पदवीधरांसाठी मोठी संधी; यूपीएससीमध्ये होत आहे भरती recruitment of graduates in UPSC | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC

UPSC Job : पदवीधरांसाठी मोठी संधी; यूपीएससीमध्ये होत आहे भरती

मुंबई : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) EPFO ​​पदांवर भरतीची तपशीलवार अधिसूचना जारी केली आहे. या भरतीद्वारे संस्थेमध्ये ५७७ पदे भरली जातील. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते www.upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचा अर्ज भरू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मार्च २०२३ आहे. (UPSC EPFO ​​Recruitment 2023) हेही वाचा - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

रिक्त जागांचा तपशील

या भरतीद्वारे एकूण ५७७ पदे भरली जातील ज्यात ४१८ पदे लेखाधिकारी आणि १५९ पदे APFC साठी आहेत.

महत्त्वाची तारीख

या UPSC भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार वेबसाइटला भेट देऊन त्यांचा अर्ज भरू शकतात. आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख १७ मार्च २०२३ आहे.

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेचे पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा

लेखा अधिकारी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३० वर्षे आहे, तर APFC पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

अर्ज

अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून २५ रुपये भरावे लागतील, तर अनुसूचित जाती, जमाती आणि महिला प्रवर्गातील उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

टॅग्स :UPSCRecruitmentjob