esakal | भारतीय नौदलात 350 हून अधिक नाविक पदांची भरती !
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय नौदलात 350 हून अधिक नाविक पदांची भरती !

भारतीय नौदलात 350 हून अधिक नाविक पदांची भरती !

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 पर्यंत आहे. जाणून घ्या सविस्तर...

सोलापूर : इंडियन नेव्हीने (Indian Navy) नाविक पदे भरण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. त्याअंतर्गत एकूण 350 जागा भरती करण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत, ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे, त्यांनी इंडियन नेव्हीच्या joinindiannavy.gov.in या अधिकृत साइटवर अर्ज करू शकतात. त्याचबरोबर या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 पर्यंत आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण 350 जागा भरती करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर, जवळपास 1750 उमेदवारांमधून एकूण 350 जागांसाठी लेखी चाचणी व शारीरिक तंदुरुस्तीसाठी (पीएफटी) (Physical fitness) बोलावले जाईल. लेखी परीक्षेला हजेरी लावण्यासाठी कट ऑफ गुण हे राज्यांनुसार वेगवेगळे असू शकतात. (Recruitment of more than 350 sailors in the Indian Navy-ssd73)

हेही वाचा: सीईटीची चिंता नको, सर्वांनाच मिळणार अकरावीला प्रवेश !

या तारखा लक्षात ठेवा

  • अर्ज करण्यास प्रारंभ तारीख : 19 जुलै 2021

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख : 23 जुलै 2021

शैक्षणिक पात्रता

सेलर पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त शालेय शिक्षण मंडळाकडून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराचा जन्म 1 एप्रिल 2001 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यान असावा.

हेही वाचा: विद्यापीठाची ऑनलाइन परीक्षा! परराज्यातील विद्यार्थ्यांची झाली सोय

अशी होईल निवड प्रक्रिया

लेखी परीक्षा आणि पीएफटीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षा आणि पीएफटीसाठी उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग पात्रता परीक्षेच्या टक्केवारीच्या आधारे (दहावीची परीक्षा) केली जाईल. कट ऑफ गुण राज्यांनुसार वेगवेगळे असू शकतात; कारण रिक्त जागा राज्यनिहाय भरण्यात येणार आहेत.

असे असेल वेतन...

नाविक पदांसाठी निवड झालेल्या उमेदवाराला प्रशिक्षण कालावधीत रुपये 14 हजार 600 वेतन तर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यावर त्यांना डिफेन्स पे मॅट्रिक्‍स (21,700 रुपये - 69,100 रुपये) वेतन पातळी तीनमध्ये ठेवले जाईल. त्याशिवाय त्यांना दरमहा 5200 रुपयांचा डीए देण्यात येईल. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

loading image