संधी नोकरीच्या... : सायबर सुरक्षा तज्ज्ञ होण्यासाठी... 

cybercrime
cybercrime

सायबर सिक्युरिटी हे माहिती तंत्रज्ञानामधील (आयटी) विशिष्ट क्षेत्र असून, कॉम्प्युटर सायन्समधील उपप्रवाह आहे. सायबर हल्ल्यांपासून संगणक ऑपरेटिंग सिस्टिम्स, नेटवर्क आणि डेटाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक कौशल्यांनी विद्यार्थ्यांना सुसज्ज करणे हा या अभ्यासक्रमांचा उद्देश आहे. ऑनलाइन ट्रान्सॅक्ट किंवा संवेदनशील डेटा वाहून नेणाऱ्या कोणत्याही उद्योगाला अशा गुन्हेगारांपासून डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी सायबर सुरक्षा व्यावसायिकाची गरज असते.

डिजिटल इंडियामध्ये तीन महत्त्वाच्या घटकांचा समावेश आहे आणि ते म्हणजे सुरक्षित आणि स्थिर डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास, सरकारी सेवा डिजिटल पद्धतीने पोहोचवणे आणि देशातील वैश्विक डिजिटल साक्षरतेची मोहीम. भारतात डिजिटायझेशनवर सुरू असलेल्या विंडफॉल इफेक्टपैकी एक म्हणजे सायबर सुरक्षा व्यावसायिकांना अचानक आणि मोठी मागणी. मात्र, भारताला सायबर सुरक्षा व्यावसायिकांची कमतरता भासत आहे. आयटीचे मूलभूत ज्ञान असलेल्या साध्या पदवीधराला सायबर सिक्युरिटीमध्ये प्रवेश करणे शक्य आहे, पण सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना प्राधान्य आहे. डिग्री सायबर सिक्युरिटी कोर्सेस : बारावी पूर्ण केल्यानंतर उमेदवार कॉम्प्युटर सायन्स (सीएस) आणि सायबर सिक्युरिटीमध्ये बी-टेक किंवा बीएस्सी पदवी मिळवू शकतात. बीटेक पदवी कार्यक्रम 4 वर्षांचे आहेत तर सीएस/ सायबर सिक्युरिटीमधील बीएस्सीचा 3 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यूजी आणि पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांचा कालावधी 10 महिने ते 1 वर्षापर्यंत असतो.

सायबर सुरक्षा क्षेत्रात येण्यासाठी लागणारे स्किल 
1) Ethical Hacking
2) Penetration Testing,
3) Web Application Security,
4) Vulnerability Assessment,
5) Cybersecurity

सायबर सिक्युरिटीमधील जॉब प्रोफाइल
1) Chief Information Security Officer
2) Penetration Testes
3) Security Auditor
4) Security Manager
5) Vulnerability Accessor
6) Cryptographer
7) Security Administrator
8) Security Consultant
9) Security Software Developer
10) Forensic Expert
11) Incident Responder
12) Security Analyst
13) Security Architect  
14) Security Engineer
15) Security Code Auditor
16) Security Specialist

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com