संधी नोकरीच्या... : करिअर शेअर बाजारातील...

Share-Market
Share-Market

शेअर बाजारातील व्यवहार आता ब्रोकरच्या ऑफिसमध्ये किंवा इंटरनेटच्या माध्यमातून कॉम्प्युटर टर्मिनल्सवर होतात. शेअर बाजारात आपण आपले करिअर मजबूतपणे घडवू शकतो. (पण हे लक्षात ठेवले पाहिजे, की भांडवल बाजार शेअर्स निवडण्यापेक्षा आणि पैसा कमावण्यापेक्षा अधिक आहे. ते वैविध्यपूर्ण, बहुआयामी आहे आणि त्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्या लोकांनी आव्हानात्मक आणि समाधानकारक करिअरसाठी स्वत:ला झोकून दिले पाहिजे!!)

भारतीय शेअर बाजारात करिअर सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. सेन्सेक्स आणि निफ्टीची खोली आणि तपशील समजून घेणाऱ्या लोकांमध्ये तुम्ही असल्यास येथे तुम्ही नक्कीच करिअर करू शकता. शिवाय, बाजारपेठेतील हालचालींच्या चढउतारांमुळे शेअर बाजार हे अनिश्चित करिअर आहे. तुम्ही शेअर बाजारात आपले करिअर प्रस्थापित करण्यासाठी योग्य मार्गांचा अवलंब केल्यास तो तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय असू शकतो. तथापि, तुम्हाला स्थिर करिअरची गरज असल्यास शेअर ट्रेडिंग स्टॉक्स आणि इन्व्हेस्टमेंट कोर्सेस करावे लागतील. भारतीयांसाठी भांडवल बाजाराचे गूढ हळूहळू नाहीसे होत चालले आहे. शिवाय लोक गुंतवणूक करण्यास आणि बाजारात जोखीम घ्यायला तयार असतात. 

सहभागवाढीमुळे बिगर बँक वित्तीय क्षेत्र वेगाने झेप घेणार आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कामगार व्यावसायिकांना प्रचंड मागणी आहे. या विभागात आपण शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी काय करावे लागते याबद्दल अधिक बोलू. 

शेअर बाजार कोणासाठी आहे? शेअर बाजार हा प्रत्येक अर्थसाक्षर व्यक्तीसाठी आहे. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास शेअर बाजार महत्त्वाचा विषय आहेच, पण रोजगाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा तितकाच महत्त्वाचा आहे, त्यातील केवळ 4 ते 5% लोक शेअर बाजारात गुंतवणूक करतात. हे प्रमाण वाढत जाईल, तशा रोजगाराच्या संधी वाढतील. या प्रवाहात स्वतःला सामील करून घ्यायचं असल्यास आपल्यालाही सक्षम बनावे लागेल.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिक्षण 
शेअर बाजार गुंतवणूक करायची असल्यास तुम्हाला शिक्षणाची कसलीही अट नाही, मात्र करिअर करायचं असल्यास काही कोर्सेस करावे लागतील. तुम्ही कोणत्या पदासाठी काम करू इच्छिता त्यावर ते अवलंबून असेल. मात्र, किमान बारावी पास असणं आवश्यक आहे. तुम्ही  B.Com., B.B.A अशा विषयातील पदवीधर असल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो. शिवाय तुमचे पदव्युत्तर शिक्षण एमबीए फायनान्स, इकॉनॉमिक्स झाले असल्यास उत्तम.

करिअर व व्यवसायाच्या संधी!
•     Trader    
•     Banks
•     Registrar Office
•     Depositories, Exchanges, DP and SEBI
•     Analyst: Fundamental & Technical
•     Asset Management Company
•     Mutual Fund Manager
•    Mutual Fund Distributor
•     Investment Advisor
•     Portfolio Manager
•     Self-Business
•     Broker

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com