RTE Admission : आरटीईअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE Admission

RTE Admission : आरटीईअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

अकाेला : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियमाअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठीची ऑनलाईन अर्ज करण्याच्या प्रक्रियेचा श्रीगणेशा झाला. ता. १७ मार्च राेजी रात्री १२ वाजतापर्यंत अर्ज करता येणाार आहे. आरटीईअंतर्गत अकोला जिल्ह्यात एक हजार ९४६ जागा राखीव असून, १९० शाळांनी नोंदणी केली केली आहे.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेशस्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकातील मुला, मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. त्यानुसार सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात आरटीईअंतर्गत प्रवेश मिळण्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रथम शाळांची नाेंदणी आणि आता ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया ता. १ मार्चपासून सुरू झाली आहे. नोंदणीच्या शेवटच्या दिवसापर्यंत १९० शाळांनी नोंदणी केली. संबंधित शाळांमधील एक हजार ९४६ जागा आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

चुकीच्या माहितीसाठी पालक जबाबदार

आरटीई अंतर्गत पाल्याचा अर्ज करताना पालकांना हमीपत्रही भरून द्यावे लागणार आहे. त्यानुसार पाल्याची चुकीची माहिती सादर करण्यासाठी पालकांनाच जबाबदार धरले जाणार आहे.

‘आरटीई पाेर्टलवर भरलेली माहिती बराेबर आहे, भविष्यात अथावा पडताळणी समितीने कागदपत्रांची व पाेर्टलवरील माहिती पडताळणी केल्यास व चुकीची कागदपत्रे सादर केल्याचे निदर्शनास आल्यास माझ्या पाल्यांचा प्रवेश रद्द हाेईल, माझ्यावर फाजैदारी कारवाई हाेईल, किंवा प्रतिपूर्तीची रक्कम शासनाकडून मिळणार नाही,

मला शाळेची फी भरणे बंधनकारक राहील, मला शिक्षा हाेईल, याची मला जाणीव आहे.’, असे हमी पत्रात नमूद आहे. त्यामुळे पाल्याच्या आरटीई प्रवेशाच्या वेळी पालकांनी योग्य ती कागदपत्रेच अपलोड करावी, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी हवी असलेली कागदपत्रे

  • बालकांचे आधार कार्ड

  • रहिवासी पुरावा

  • जन्मतारखेचा पुरावा

टॅग्स :schoolstudentRTE