
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर ज्या वेगाने जगभरात आणि भारतातही होत आहे, तो पाहता यापुढील काळात शिक्षणपद्धतीत मोठे फेरबदल होणार आहेत.
नोकरी/बाजारपेठ : रोबोटिक्स, एआय संदर्भात नवे अभ्यासक्रम
- सचिन आरोंदेकर
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) आणि रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा वापर ज्या वेगाने जगभरात आणि भारतातही होत आहे, तो पाहता यापुढील काळात शिक्षणपद्धतीत मोठे फेरबदल होणार आहेत. हे बदल स्वीकारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. सध्या तंत्रज्ञान आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्यांना या बदलांना सुसंगत स्कील वाढवावी लागणार आहेत.
येत्या दोन तीन वर्षांत ''एआय''चा वापर वाढेल तसे ऑटोमेशन होत जाईल, हे बदल करिअरच्या अनेक नवीन संधी घेऊन येईल. ‘आर्टिलिजंट’ कंपनीने बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवाशांना मदत करणारा रोबोट तयार केला, तशाच पद्धतीने आता अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांचे ऑटोमेशन करताना एआय आणि रोबोटिक्सचा वापर करत आहेत. विमान वाहतूक क्षेत्रात गेल्या एक दोन वर्षांपासून या तंत्रज्ञानाचा वापर विविध कारणांसाठी होऊ लागला आहे.
विमान पार्किंग स्टँड पासून रन वे पर्यंत नेण्यासाठी आता टॅक्सी बोटचा वापर केला जातो. हा टॅक्सी बोट ‘एआय’ आणि रोबोटिक्सचाच आविष्कार आहे. या वेगाने येऊ पाहणाऱ्या तंत्रज्ञानासाठी कुशल मनुष्यबळ लागणार आहे. एआय आणि रोबोटिक्स यांचा वाढता वापर पाहता रोबोटिक्स इंजिनिअर, सॉफ्टवेअर इंजिनिअर, रोबोट ऑपरेटर, मशिन लर्निंग एक्स्पर्ट अशा विविध तज्ज्ञांची गरज भासणार आहे. त्यासाठी नवनवीन कौशल्य आत्मसात करावी लागणार आहेत. सहाजिकच सध्या असे तज्ज्ञांची संख्या कमी आहे, त्यामुळेच या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. उद्योगांची ही गरज लक्षात घेऊन सरकारने नवनवीन अभ्यासक्रम, कोर्सेस आणण्याचा विचार करत आहे.
‘आर्टिलिजंट’ कंपनीस सरकारने सल्लागार म्हणून नियुक्ती केली असून वेगवेगळे अभ्यासक्रम तयार करण्याची जबाबदारी सोपवली आहे. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजसाठी ‘सेंट्रल फॉर एक्सलन्स इन रोबोटिक्स’ कमिटी स्थापन करण्यात आली आहे. एआय आणि रोबोटिक्स क्षेत्रात होत असणारे बदल लक्षात घेऊन त्यासाठी आवश्यक असणारे अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहेत. ‘आर्टिलिजंट’चे सहसंस्थापक पंकज जोशी, हरीश मढे त्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. येत्या तीन चार महिन्यांत या संदर्भातील विविध कोर्सेस तयार होतील आणि ते इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये शिकवले जातील. या भविष्यवेधी क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या विद्यार्थ्यांनी नक्कीच या बदलांकडे लक्ष ठेवावे.
खास इंटर्नशिप प्रोग्रॅम
बेसिक इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, सॉफ्टवेअर इंजिनिअर, बीएस्सी, एमएस्सी कॉम्प्युटर अशांना रोबोटिक्स मध्ये करिअर करण्याची संधी आहेत. एआय, रोबोटिक्स क्षेत्रातील वाढती गरज लक्षात घेऊन ''आर्टिलिजंट'' ने खास इंटर्नशिप प्रोग्रॅमही जाहीर केला आहे. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना हे एक व्यासपीठ असेल.
(लेखक ‘आर्टिलिजंट सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे संचालक (स्ट्रॅटेजिक अलायन्सेस) आहेत.