esakal | हेल्थकेअर क्षेत्रात करिअर करायचंय? टेक महिंद्रा फाउंडेशनचा 'SMART' पर्याय
sakal

बोलून बातमी शोधा

हेल्थकेअर क्षेत्रात करिअर करायचंय? टेक महिंद्रा फाउंडेशनचा 'SMART' पर्याय

जगभरात सध्या हेल्थकेअर क्षेत्रात प्रोफेशनल्सची मागणी वाढल्याचं आपण पाहिलं आहे. त्यात टेक महिंद्रा फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे.

हेल्थकेअर क्षेत्रात करिअर करायचंय? टेक महिंद्रा फाउंडेशनचा 'SMART' पर्याय

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जगभरात सध्या हेल्थकेअर क्षेत्रात प्रोफेशनल्सची मागणी वाढल्याचं आपण पाहिलं आहे. त्यात टेक महिंद्रा फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. हेल्थकेअरसाठी SMART अकॅडमी, पुणे सुरु केले आहे. यामाध्यमातून तरुणांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे. देशातील ही आठवी SMART अकॅडमी आहे. तसंच हेल्थकेअर आणि पॅरामेडिक्स क्षेत्रातील चौथी असल्याची माहिती टेक महिंद्रा फाउंडेशनने दिली आहे. Salesian Sisters च्या सहयोगाने हे काम सुरु आहे. पुण्यातील मुंढवा इथं 7 हजार 516 चौरस वर्ग फूट इतक्या परिसरात ही संस्था आहे. यामध्ये 7 क्लासरूम आणि सर्व सुविधांसह अद्ययावत अशा 7 लॅब आहेत.

सध्या SMART हेल्थकेअर अकॅडमीमध्ये जनरल ड्युटी असिस्टंट, हॉस्पिटल हायजिन असिस्टंट, हॉस्पिटल फ्रंट ऑफिस अँड बिलिंग एक्झिक्युटीव्हच्या कोर्ससाठी प्रवेश सुरु आहे. हेल्थकेअर सेक्टर स्किल काउन्सिलचे सर्टिफाइड असे हे कोर्स आहेत. यासोबत संस्था मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, डायलिसिस टेक्नॉलॉजी, ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजी, व्हिजन अँड ऑप्थॅल्मिक टेक्नॉलॉजी आणि एक्सरे अँड इमेजिंग टेक्नॉलॉजीचेसुद्धा प्रशिक्षण देते.

हेही वाचा: बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! IRCTC एजंट होऊन कमवा ५० हजार रुपये

हेल्थकेअर ट्रेनिंगशिवाय विद्यार्थ्यांना फाउंडेशन स्किल कोर्सचे प्रशिक्षणही दिले जाते. यामध्ये इंग्लिश, बेसिक आयटी आणि सॉफ्ट स्किल्स शिकवली जातात. तसंच कोर्स पूर्ण झाल्यानंतर प्लेसमेंटसाठी विद्यार्थ्यांना एक सहाय्यक मदत करतो. करिअऱच्या दृष्टीकोनातून हे सर्व कोर्स तयार करण्यात आले आहेत.

संस्थेची वैशिष्ठ्ये

1. जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा

2. मोठ्या आणि नामांकित रुग्णालयामध्ये प्रशिक्षण

3. प्लेसमेंट असिस्टन्स

4. तज्ज्ञ मार्गदर्शक आणि मान्यताप्राप्त अभ्यासक्रम

बारावीनंतर करिअर ओरिएंटेड शॉर्ट टर्म कोर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी सकाळ माध्यम समुहाने निर्माण केली आहे. सकाळ एज्युकेशन एक्स्पो 2021 च्या माध्यमातून असंख्य असे करिअर ओरिएंटेड कोर्स उपलब्ध करून देण्यात येतील. रजिस्ट्रेशन करण्यासाठी www.sakalexpo.com वर क्लिक करा.

loading image
go to top