चिंचवडमध्ये शनिवारपासून एज्यु-एक्स्पो

‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’ हे शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थी व पालकांसाठी आणले आहे.
Sakal Vidya Education Expo 2022
Sakal Vidya Education Expo 2022Sakal
Summary

‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’ हे शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थी व पालकांसाठी आणले आहे.

पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२२’ हे शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थी व पालकांसाठी आणले आहे. येत्या शनिवारी (ता. १८) व रविवारी (ता. १९) प्रदर्शन आयोजित केले आहे. चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्‍टर एक्झिबिशन सेंटरमध्ये प्रदर्शन होईल.

शहरातील नामांकित शिक्षण संस्था प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. त्यात विविध शैक्षणिक पर्यायांची माहिती व मार्गदर्शनपर चर्चासत्र असणार आहेत. कनिष्ठ महाविद्यालयापासून कोचिंग क्लासेस, व्यावसायिक क्लासेसच्या ‘केजी टू पीजी’ अभ्यासक्रमाची, सर्व उपलब्ध करिअरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थी-पालकांना एकाच छताखाली मिळू शकणार आहे. वेगवेगळ्या विद्याशाखा, अनेक महाविद्यालये, मान्यवर वक्त्यांचे मार्गदर्शन, व्याख्याने यांचा समावेश प्रदर्शनात असेल.

एज्युकेशन एक्स्पोचे मुख्य प्रायोजक भारती विद्यापीठ आहे. एमआयटी आर्टस्, कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज आळंदी हे सहप्रायोजक आहेत. इंदिरा ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट, एएसएम ग्रूप ऑफ इन्स्टिट्यूट, अजिंक्य डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट सहयोगी प्रायोजक आहेत.

काय असेल प्रदर्शनात

महाविद्यालयीन प्रवेश, दहावी-बारावीनंतर शिक्षणाचे उपलब्ध असणाऱ्या पर्यायाची माहिती; याशिवाय कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, इंटेरिअर डिझाइन, फॅशन डिझायनिंग, पॅरामेडिकल, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान यांसह अन्य अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थी-पालकांना प्रदर्शनातून घेता येणार आहे. त्याचबरोबर नाटा, जेईई, नीट, सीईटी यांसह अन्य स्पर्धा परीक्षांबाबतही येथे मार्गदर्शन मिळणार आहे.

कोरोनामुळे दोन वर्षे अनेक मुलांचे शैक्षणिक नुकसान झालेले आहे. आता ‘सकाळ विद्या’ या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांना थेट नव्या-जुन्या अभ्यासक्रमांची माहिती मिळणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षणाविषयीचे चित्र स्पष्ट होण्यास मदत होईल.

- निकिता आगरवाल, संचालक, टाइम्स ॲन्ड ट्रेंड्स ॲकॅडमी, चिंचवड

अत्यंत उपयोगी असा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांना एका छताखाली शेकडो करिअर ऑप्शन आणि शैक्षणिक संस्थांची माहिती मिळते. त्यातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि योग्य दिशा मिळते.

- दीपक शहा, संचालक, प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

काय? कुठे? कधी? केव्हा?

कोणासाठी? - विद्यार्थी व पालक

काय? - सकाळ विद्या एज्यु-एक्स्पो २०२२

कुठे? - ऑटो क्लस्‍टर एक्झिबिशन सेंटर, चिंचवड

कधी? - शनिवार, १८ आणि रविवार, १९ जून २०२२ रोजी

केव्हा? - सकाळी ११ ते रात्री ८

आठ वर्षांपासून ‘सकाळ’सोबत काम करत आहोत. ‘सकाळ विद्या’सारख्या शैक्षणिक प्रदर्शनातून विद्यार्थी व पालकांना उत्तम करिअर पर्याय उपलब्ध होतात. त्यांचा कल माहिती पडतो. त्यातून आम्हालादेखील विद्यार्थ्यांना काय अपेक्षित आहे, याची माहिती मिळते.

- राजेश सप्रा, संचालक एआयसीटी डिसाईन ॲकॅडमी

सर्व शैक्षणिक पर्याय एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने हे प्रदर्शन शिक्षण संस्था आणि विद्यार्थी-पालक यांच्यातील दुवा ठरत आले आहे. या प्रदर्शनातून आम्हालादेखील गुणवंत विद्यार्थी मिळाले आहेत.

- प्रा. मनीष मुंदडा, अध्यक्ष, साई बालाजी एज्युकेशन सोसायटी ट्रस्ट

‘सकाळ विद्या’ या शैक्षणिक प्रदर्शनातील स्टॉलद्वारे अनेक क्षेत्रातील करिअर, त्यातील संधी या विषयीची माहिती, तसेच अनेक संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांबद्दल माहिती विद्यार्थी-पालकांना थेट मिळते. पालकांना महाविद्यालय निवडण्याची संधी मिळते.

- डॉ. आर. एस. यादव, सचिव, अलार्ड चॅरिटेबल ट्रस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com