Sakal Vidya Education Expo : दहावी, बारावीनंतर ठरवा करिअरची दिशा Sakal Vidya Education Expo Decide career direction after ssc and hsc education | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sakal Vidya Education Expo

Sakal Vidya Education Expo: दहावी, बारावीनंतर ठरवा करिअरची दिशा

पुणे - दहावी-बारावीनंतर नेमका प्रवेश कुठे घ्यायचा, गुणांनुसार करियरसाठी कोणते क्षेत्र निवडायचे, अभियांत्रिकी की वैद्यकीय शिक्षण घ्यावे, करिअरची नेमकी दिशा कशी ठरवावी, असे नानाविध प्रश्न तुम्हाला पडलेत असतील, तर काळजी करू नका.

तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी, शंकांचे निरसन करण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२३’ हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. राज्यातील सर्वाधिक मोठे असणारे हे शैक्षणिक प्रदर्शन नऊ ते ११ जूनदरम्यान आयोजित केले आहे.

पुण्यासह राज्यातील नामांकित शैक्षणिक संस्था यात सहभागी होणार असून दिग्गज मार्गदर्शकांची व्याख्याने ऐकण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो २०२३’ हा चाणक्य मंडल परिवार प्रस्तुत आहे.

तर पॉवर्ड बाय एमआयटी वर्ल्ड पीस युनिर्व्हसिटी आणि एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी आहे. कनिष्ठ महाविद्यालयांपासून ते कोचिंग क्लास, व्यावसायिक क्लासच्या ‘केजी टू पीजी’ अभ्यासक्रमाची, सर्व उपलब्ध करियरच्या पर्यायांची माहिती विद्यार्थी-पालकांना एकाच छताखाली या प्रदर्शनाच्या निमित्ताने मिळू शकणार आहे.

दहावी-बारावीनंतर उपलब्ध होणाऱ्या करियरच्या संधी, महाविद्यालयीन प्रवेशाची प्रक्रिया याचे मार्गदर्शन आणि त्यासमवेत विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवस्थापन, औषधनिर्माणशास्त्र, तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, हॉटेल मॅनेजमेंट, विधी, आर्किटेक्चर, माहिती तंत्रज्ञान, कला, वाणिज्य यांसह अन्य अभ्यासक्रमांची माहिती येथे मिळेल.

त्याचबरोबर विविध प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षा याबाबतही मार्गदर्शन या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. या तीन दिवसीय शैक्षणिक प्रदर्शनात विधी क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम आणि उपलब्ध संधींबाबत ‘लॉ सिम्पोझियम’ १० जूनला, तर वास्तूकलेशी संबंधित ‘आर्किटेक्चर’चे अभ्यासक्रम आणि त्यातील विविध पर्यायांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘आर्किटेक्चर सिम्पोझियम’ ११ जूनला आयोजित केले आहे.

एक्स्पोविषयी...

कालावधी : ९ ते ११ जून

स्थळ : गणेश कला क्रीडा मंच

वेळ : सकाळी १० ते रात्री आठ वाजेपर्यंत