
Sakal Vidya : विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर; ‘सकाळ विद्या’ आणि ‘विद्यालंकार इन्स्टिट्यूट’तर्फे संधी
पुणे : शास्त्र शाखेबरोबरच अभियांत्रिकी आणि फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे. ‘सकाळ विद्या’ आणि ‘विद्यालंकार इन्स्टिट्यूट’ यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या शिबिरात तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
शास्त्र शाखा, अभियांत्रिकी शाखा, फार्मसी शाखेकडे कल असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेबाबत अनेक शंका असतात. पुरेशी माहिती विद्यार्थ्यांना नसते. ही माहिती या शिबिराच्या माध्यमातून दिली जाणार आहे. या शिबिरात प्राध्यापक हितेश मोघे, प्रा. प्रकाश जकातदार मार्गदर्शन करणार आहेत.
प्रा. मोघे यांचे आय. आय. टी. (मुंबई) येथून शिक्षण पूर्ण झाले असून, ते पंधरा वर्षांपासून गणित विषयाचे अध्यापन करत आहेत. ‘विद्यालंकार इन्स्टिट्यूट’च्या गणित विभागाचे ते विभाग प्रमुख आहेत. या शिबिरात ते अभियांत्रिकी, शास्त्र आणि फार्मसी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी कोणत्या प्रवेश परीक्षा असतात, त्यात यशस्वी होण्यासाठी तयारी कशी करायची याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
प्रा. जकातदार हे पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. प्रवेश परीक्षेची पाल्य तयारी करत असताना त्यासाठी पालकांची भूमिका काय असावी, यावर त्यांचे व्याख्यान होणार आहे. या शिबिरात एमएचटी-सीईटी या परिक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविलेला ‘विद्यालंकार इन्स्टिट्यूट’चा विद्यार्थी प्रणव कुटे यांच्या अनुभवाची माहिती मिळणार आहे.
शिबिराचे उद्दिष्ट...
अभियांत्रिकी, शास्त्र शाखा, फार्मसी क्षेत्रात कोणत्या संधी आहेत, याचे मार्गदर्शन
या क्षेत्रात प्रवेश परीक्षांची तयारी कशी करायची?
योग्य करिअरसाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांचा शोध
बारावीसाठी कोणते बोर्ड निवडणार?
पाल्य प्रवेश परीक्षांची तयारी करत असताना पालकांची भूमिका कशी असावी याचे मार्गदर्शन
कधी आहे शिबिर?
तारीख : रविवार ता. २ एप्रिल
वेळ : सकाळी ११ वाजता
कोठे : मॉडर्न महाविद्यालय ऑडिटोरियम
कोण होऊ शकते सहभागी? - दहावी आणि त्यापुढील पाल्य आणि त्यांचे पालक