‘डिजि’साक्षर : ऑनलाइन जाहिरातींचे मार्केट

फेसबुक आणि गूगल हे जगातले सर्वांत मोठे ऑनलाइन जाहिरातींचे प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यांचं त्यातून किती उत्पन्न आहे हे बघुया.
Online Advertising
Online Advertisingsakal
Summary

फेसबुक आणि गूगल हे जगातले सर्वांत मोठे ऑनलाइन जाहिरातींचे प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यांचं त्यातून किती उत्पन्न आहे हे बघुया.

- समीर आठल्ये

फेसबुक आणि गूगल हे जगातले सर्वांत मोठे ऑनलाइन जाहिरातींचे प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यांचं त्यातून किती उत्पन्न आहे हे बघुया.

फेसबुकचं गेल्या वर्षीचं उत्पन्न (नफा नव्हे)

  • ११७ बिलियन डॉलर्स इतके आहे.

  • १ मिलीयन = १० लाख

  • १० मिलीयन = १ कोटी

  • १००० मिलीयन = १ बिलियन = १०० कोटी

  • १०० बिलियन = १०००० कोटी

  • ११७ बिलियन = ११७०० कोटी

एक डॉलरची किमत ७५ रुपये धरली तर फेसबुकचं एका वर्षाचं उत्पन्न ११,७०० कोटी डॉलर्स गुणिले ७५ म्हणजेच ८,७७,५०० कोटी रुपये एवढं आहे. यातील जवळपास ९० टक्के उत्पन्न जाहिरातींमधून आले आहे. जगभरात ऑनलाइन जाहिराती करणाऱ्यांपैकी जवळपास ९४ टक्के जण फेसबुकचा वापर करतात.

गूगलने २०२१मधील केवळ जाहिरातींमधून २०९.५ बिलियन डॉलर्स मिळवले. त्यांच्या जाहिरात उत्पन्नात २०२० पेक्षा ४१ टक्के वाढ झाली. याचं मुख्य कारण हे गेल्या दोन वर्षात लोकांचा वाढलेला इंटरनेटचा वापर हे आहे.

भारताचा या उत्पन्नातील वाटा त्यामानाने कमी आहे. गूगलचे भारतातील उत्पन्न ६,४०० कोटी रुपये तर फेसबुकचं भारतातील जाहिरात उत्पन्न १,४८१ कोटी रुपये आहे. हे आकडे या कंपन्यांच्या जगभरातल्या आकड्यांपेक्षा कमी असले तरीही येत्या दोन वर्षात यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होईल अशी अपेक्षा आहे. ऑनलाइन जाहिरातींमधून हे प्लॅटफॉर्म्स वर्षाला पाच लाख कोटी रुपये मिळवतील असा अंदाज आहे.

भारतात इंटरनेट सेवेचा दर्जा दिवसेंदिवस सुधारतो आहे आणि इंटरनेटचे दरही कमी होत आहेत. यामुळे अॕमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या पोर्टल्सवरून खरेदी करायचं प्रमाण वाढलं आहे. शिवाय नेटफ्लिक्स, अॕमेझॉन प्राइम सारखे ओटीटी प्लॅटफॉर्म्सही लोकप्रिय झाले आहेत.

गेल्या दोन वर्षात आपलं बाहेर पडणं कमी झालं. त्यामुळे पूर्वी ऑनलाइन माध्यमं ही फक्त तरुणांसाठी आहेत हा जो समज होता त्याला मोठा धक्का बसला. गेल्या दोन वर्षात सर्व वयोगटांतील लोकांनी इंटरनेट वापरायला सुरुवात केली. झूम आणि गूगल मीट सारख्या ऑनलाइन मीटिंग अॕप्समुळे भजनी मंडळंही इंटरनेट वापरू लागली. हा जो मोठा वर्ग इंटरनेटवर आला तो भविष्यात किंवा कोव्हिडोत्तर काळात देखिल इंटरनेटचा वापर सुरूच ठेवेल. यामुळे भारतातील ऑनलाइन जाहिरातींचे प्रमाण खूप जास्त प्रमाणात वाढेल. कॉलेज संपवून करिअर सुरू करणाऱ्या मुलामुलींना डिजिटल मार्केटिंग हा अतिशय आश्‍वासक असा पर्याय निर्माण झाला आहे. त्यांनी याविषयाचा अभ्यास केल्यास फायदा होईल.

ऑनलाइन जाहिरातींमुळे फसवणूक आणि आर्थिक गुन्हे वाढत आहेत. डिजिटल जाहिरातदार श्रीमंत होणं ठिक आहे, परंतु निष्काळजीपणा किंवा माहितीच्या अभावाने आपलं नुकसान होऊन चालणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com