‘डिजि’साक्षर : सोशल मीडिया आणि वापरकर्ते

भारतात ‘ऑर्कुट’मुळे सोशल मीडियाचा वापर सुरू झाला. ऑर्कुट आणि फेसबुक हे दोन्ही २००४मध्ये पंधरा दिवसांच्या अंतराने सुरू झाले.
Social Media
Social MediaSakal
Summary

भारतात ‘ऑर्कुट’मुळे सोशल मीडियाचा वापर सुरू झाला. ऑर्कुट आणि फेसबुक हे दोन्ही २००४मध्ये पंधरा दिवसांच्या अंतराने सुरू झाले.

- समीर आठल्ये

भारतात ‘ऑर्कुट’मुळे सोशल मीडियाचा वापर सुरू झाला. ऑर्कुट आणि फेसबुक हे दोन्ही २००४मध्ये पंधरा दिवसांच्या अंतराने सुरू झाले. सुरुवातीला भारतात ऑर्कुट जास्त वापरलं गेलं. हळूहळू फेसबुक लोकांना आवडायला लागलं आणि ऑर्कुट मागे पडलं. भारतात १ कोटी ९० लाख लोक ऑर्कुट वापरायचे. परंतु फेसबुकच्या प्रसिद्धीपुढे ऑर्कुट मागे पडलं आणि २०१४मध्ये ते बंद झालं.

सोशल मीडिया हा महासागर मानला तर फेसबुक त्यातला देवमासा आहे.

  • जगात जवळपास ४०० कोटी लोक सोशल मीडियाचा वापर करतात.

  • त्यातले २८९ कोटी लोक फेसबुक वापरतात.

  • जगाच्या लोकसंख्येच्या अर्धे लोक सोशल मीडिया वापरतात आणि ६० टक्के लोक फेसबुक वापरतात.

  • सोशल मीडिया वापरणारे ४०० कोटी पेक्षा अधिक लोक आहेत त्यातले ९९ टक्के लोक सोशल मीडिया वेबसाईट्स किंवा अॕप्स हे मोबाईल वरून वापरतात.

जगात सर्वात जास्त वापरल्या जाणाऱ्या पहिल्या चार सोशल मीडिया अॕप्सपैकी ३ फेसबुकच्या मालकीच्या आहेत.

१. फेसबुक (फेसबुक)

२. युट्यूब (गूगल)

३. व्हॉट्सअॕप (फेसबुक)

४. इंस्टाग्राम (फेसबुक)

फेसबुक हा सोशल मीडियाच्या समुद्रातील देवमासा की स्वतः समुद्र आहे असा प्रश्न पडावा असे आकडे खाली देतोय.

इंस्टाग्राम

  • जगभरात १०० कोटी लोक महिन्यात एकदा तरी वापरतात. त्यातले ५० कोटी दैनंदिन वापरकर्ते.

  • भारतात सर्वाधिक म्हणजे सुमारे १८ कोटी वापरकर्ते.

  • इंस्टाग्रामचं उत्पन्न २४०० कोटी डॉलर्स इतकं आहे.

  • जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो हा इंस्टाग्रामवरही सर्वाधिक फॉलोअर्स असलेली व्यक्ती आहे. त्याला ४० कोटीपेक्षा जास्त लोक फॉलो करतात. इंस्टाग्राम वापरणारे ३३ टक्के लोक त्याला फॉलो करतात.

फेसबुक

  • जगभरात २८९ कोटी वापरकर्ते

  • त्यातले १९० कोटी दैनंदिन वापरकर्ते

  • भारतात ३४ कोटी वापरकर्ते. ही संख्या जगात सगळ्यात जास्त आहे.

  • फेसबुकवर कुठल्याही वेळेला साडे तेरा कोटी खोटी प्रोफाइल्स असतात. फेसबुक रोज ७७ लाख खोटी प्रोफाइल्स डिलीट करतं.

  • फेसबुकचं २०२०मधील वार्षिक उत्पन्न ८५०० कोटी डॉलर्स एवढं आहे आणि नफा ३२०० कोटी डॉलर्स एवढा आहे.

  • फेसबुकचं भारतातील उत्पन्न १४८१ कोटी (२०२१मधील) रुपये आहे आणि नफा रुपये १२८ कोटी इतका आहे.

  • जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू ख्रिस्तीयानो रोनाल्डो हा फेसबुकवर सगळ्यात जास्त फॉलोअर्स असलेली व्यक्ती आहे. त्याला १५ कोटी पेक्षा जास्त लोक फॉलो करतात.

व्हॉट्सअॕप

  • जगभरात २०० कोटी वापरकर्ते. सगळ्यात जास्त वापरलं जाणारं मोबाईल मेसेजिंग अॕप.

  • जगभरात रोज १०० अब्जापेक्षा जास्त मेसेजेस पाठवले जातात.

  • प्रत्येक माणूस रोज सरासरी ३८ मिनिटं व्हॉट्सअॕपवर घालवतो.

  • भारत हा व्हॉट्सअॕप वापरण्यात सर्वांत पुढे असून ३९ कोटी वापरकर्ते.

हे सर्व आकडे डोळे फिरवणारे आहेत. त्यामुळे सोशल मीडिया आपल्या दैनंदिन जीवनात किती महत्त्वाचा झाला आहे हे समजतं. त्यामुळे सोशल मीडिया अत्यंत जबाबदारीने वापरणे तितकंच महत्त्वाचे आहे. पुढील लेखांमध्ये आपण सोशल मीडिया कंपन्या पैसे कसे मिळवतात, सोशल मीडियावर होणारे गैरव्यवहार, त्याचा गैरवापर, गुन्हे आणि आपण घ्यायची काळजी याबद्दल माहिती घेऊ.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com