‘डिजि’साक्षर : ऑनलाइन खरेदीचा वाढता कल

कुणीही दुकानातून एखादी वस्तू खरेदी केली तर आपण नेहमी ऐकतो ते विधान म्हणजे, ‘ऑनलाइन का नाही घेतलं हे? स्वस्त मिळालं असतं!’
Online Purchasing
Online PurchasingSakal
Summary

कुणीही दुकानातून एखादी वस्तू खरेदी केली तर आपण नेहमी ऐकतो ते विधान म्हणजे, ‘ऑनलाइन का नाही घेतलं हे? स्वस्त मिळालं असतं!’

- समीर आठल्ये

कुणीही दुकानातून एखादी वस्तू खरेदी केली तर आपण नेहमी ऐकतो ते विधान म्हणजे, ‘ऑनलाइन का नाही घेतलं हे? स्वस्त मिळालं असतं!’ वस्तू ऑनलाइनच स्वस्त मिळतात का? आणि मिळत असतील तर या इ-कॉमर्स कंपन्यांना त्या स्वस्तात विकणं कसं काय परवडतं? याचं उत्तर आहे की गोष्टी ऑनलाइन नेहमीच स्वस्त नाही मिळत. त्या अधूनमधून स्वस्त मिळतात. रोज नाही.

इंटरनेटवर वस्तू स्वस्त विकता येण्यामागे बरीच कारणं आहेत. त्यातील काही महत्त्वाची कारणे खालील प्रमाणे...

१. लोकांना ऑनलाइन खरेदीची सवय लागावी.

२. लोक खरेदी करतात तेव्हा त्यांच्या आवडीनिवडीची माहिती मिळते.

३. जास्त मार्जिन असणाऱ्या वस्तूच स्वस्त मिळतात.

४. या कंपन्या श्रीमंत आहेत.

इंटरनेटवरून वस्तू विकणे हा व्यवसायाचा बऱ्यापैकी नवीन मार्ग आहे. त्यामुळे अजूनही लोक मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन खरेदी करत नाहीत. परंतु या कंपन्यांना बाजारात टिकून राहण्यासाठी लोकांना ऑनलाइन खरेदी करण्याची सवय लावायला लागेल. त्यासाठी काहीतरी आकर्षण म्हणून सुरवातीला या कंपन्या वस्तू वाट्टेल त्या दराला विकतात. यांना अनेकदा मोठमोठ्या गुंतवणूकदारांकडून गुंतवणूक मिळालेली असते. ती गुंतवणूक या कंपन्या वस्तू स्वस्त विकण्यासाठी आणि त्याची जाहिरात करण्यासाठी वापरतात.

एकदा ग्राहक दुकानात आला की मग शक्यतो एकच वस्तू घेत नाही. हा नियम वापरून या कंपन्या काही वस्तूंवर भरभरून सूट देतात आणि बाकी वस्तू दुकानात ज्या किमतीला मिळतात त्याच किमतीला विकतात. यातून ग्राहक गरजेच्या नसलेल्या वस्तूही विकत घेतो आणि त्याला ऑनलाइन खरेदी करण्याची सवय लागते. खरंतर दुकानांमध्येही अशा पद्धतीच्या सवलती असतात. परंतु ऑनलाइन खरेदी घरबसल्या होते ही या व्यवसायाची जमेची बाजू आहे. शिवाय वस्तू घरपोच मिळते.

दुकानांमध्येही सेल लागतातच परंतु ते ठराविक काळासाठी असतात. त्यांच्याकडे चांगली सॉफ्टवेअर नसतात. जी वापरून ते ग्राहकाच्या आवडीनिवडी, खरेदीची पद्धत, खरेदीचा इतिहास या गोष्टींचं विश्लेषण करू शकत नाहीत. याउलट ई-कॉमर्स कंपन्यांकडे या माहितीचं विश्लेषण करणारी अत्यंत चांगली सॉफ्टवेअर्स असतात. ती वापरून या कंपन्या रोज कुठल्या ना कुठल्या वस्तूवर सूट आणि सवलती जाहीर करतात आणि ही माहिती सोशल मीडिया आणि त्यांच्याकडे असलेल्या त्यांच्या ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवून देतात. कुठल्याही दुकानदारांपेक्षा या कंपन्या आपल्या नेहमीच्या ग्राहकाकडे जास्त सहजपणे पोहोचतात.

या कंपन्यांना मिळालेल्या गुंतवणुकीमुळे त्यांची तोट्यात व्यवसाय चालवायची क्षमता ही आपल्या नेहमीच्या दुकानदारांपेक्षा कित्येक पटींनी जास्त असते.

ऑनलाइन खरेदीमध्ये सगळ्यात जास्त मार्जिन असणाऱ्या वस्तूच स्वस्त मिळायची शक्यता जास्त आहे. कपडे, दागदागिने किंवा तरुणांना आकर्षित करणाऱ्या वस्तूही स्वस्त मिळतात. कारण त्यांना तरुण ग्राहक ऑनलाइन खरेदी मोठ्या प्रमाणात करतं हे माहीत आहे. याशिवाय जमा झालेल्या माहितीमधून ग्राहकांना इतर काही सेवा किंवा वस्तू परंतु विकता येतात आणि इकडे सूट दिल्यामुळे झालेलं नुकसान भरून काढता येतं. या कंपन्या जे तंत्रज्ञान वापरतात ते दुकानदारांनीही वापरलं पाहिजे. त्याशिवाय ते ऑनलाइन खरेदीबरोबर स्पर्धा करू शकणार नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com