esakal | ICAI CA Exam 2021 : सीए इंटर व अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; असा भरा परीक्षा अर्ज..

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

आयसीएआयने चार्टर्ड अकाउंटंट इंटर आणि अंतिम परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले असून परीक्षा मे 2021 मध्ये सुरू होणार आहे. या परीक्षेसंदर्भात काही महत्वपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे..

ICAI CA Exam 2021 : सीए इंटर व अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; असा भरा परीक्षा अर्ज..
sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : ICAI CA Exam Schedule 2021 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) सीए परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यंदा सनदी लेखापाल इंटर व अंतिम परीक्षा (CA Inter and Final Exam 2021) मे महिन्यात घेण्यात येणार आहेत. पुढील परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक असे तपासा..

आयसीएआयने सीए इंटर ओल्ड आणि न्यू स्कीम व सीए फायनल ओल्ड अँड न्यू स्कीमच्या सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षांसाठी अर्ज करण्याचे तपशीलही जाहीर करण्यात आले असून कोणत्या कोर्ससाठी परीक्षा असतील हे जाणून घ्या. तसेच कधी आणि कसा अर्ज करावा, हे ही समजून घ्या... 
स्पर्धा परीक्षा टॉप करण्याचा हा आहे सक्सेस फंडा, मिळवाल पैकीच्या पैकी गुण

सीए इंटर ओल्ड स्कीम (CA Inter Exam old) : जुन्या स्कीम अंतर्गत सीए इंटर कोर्स परीक्षा 22 मे 2021 पासून सुरू होईल. गट -1 साठी या परीक्षा 22, 24, 27 आणि 29 मे 2021 रोजी घेण्यात येतील. त्याचबरोबर ग्रुप -2 साठी 31 मे, 2 आणि 4 जून रोजी परीक्षा असतील.

सीए इंटर न्यू स्कीम (CA Inter Exam New) : सीए इंटरमीडिएट (नवीन) कोर्स परीक्षा 22, 24, 27 आणि 29 मे रोजी घेण्यात येतील. गट -2 च्या या कोर्सच्या परीक्षा 31 मे, 2, 4 आणि 6 जून 2021 रोजी घेण्यात येतील.

सीए अंतिम परीक्षा जुनी (CA Final Exam Old) : सीए अंतिम परीक्षा गट -1 जुन्या योजनेंतर्गत 21, 23, 25 आणि 28 मे रोजी होईल. तसेच गट -2 मधील परीक्षा 30 मे, 1, 3 आणि 5 जून रोजी घेण्यात येणार आहे.

ऑफिस मीटिंग बनवा अधिकाधिक प्रॉडक्‍टिव्ह ! या मार्गांचा करा अवलंब

सीए अंतिम परीक्षा नवीन (CA Final Exam New) : सीए अंतिम नवीन कोर्स गट -1 मधील परीक्षा 21, 23, 25 आणि 28 मे रोजी घेण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी गट -2 मधील परीक्षा 30 मे, 1, 3 आणि 5 जून रोजी घेण्यात येणार आहे.

कधी आणि कसा अर्ज करावा (ICAI CA Exam 2021 application process)

सीए इंटर आणि अंतिम परीक्षांना बसण्यासाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करावा लागेल. आयसीएआय icaiexam.icai.org वेबसाइटवर भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरता येतो. आपल्याला अर्ज करण्यासाठी 31 मार्च 2021 ते 13 एप्रिल 2021 पर्यंत वेळ देण्यात आला आहे.

  • आयसीएआयने सीए इंटर आणि अंतिम परीक्षांचे वेळापत्रक केले जारी
  • जुन्या आणि नवीन अभ्यासक्रमांच्या परीक्षा मे 2021 मध्ये होणार सुरू
  • मार्च-एप्रिल 2021 मध्ये अर्ज करावा लागणार