esakal | GATE 2021 : आयआयटीकडून उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका जाहीर; 'या' दिवशी होणार निकाल प्रसिध्द

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News

आयआयटी बॉम्बेने गेट 2021 परीक्षेसाठी उत्तरपत्रिका व प्रश्नपत्रिका नुकतीच जाहीर केली असून प्रतिसाद पत्रक देखील अपलोड केली आहेत.

GATE 2021 : आयआयटीकडून उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका जाहीर; 'या' दिवशी होणार निकाल प्रसिध्द
sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : GATE 2021 Question Paper, Answer Key : अभियांत्रिकी पदवीधर एप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंगची (GATE 2021) प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका आणि प्रतिसाद पत्रके जाहीर करण्यात आली आहेत. आयआयटी बॉम्बेने हे सर्व दुवे गेटच्या अधिकृत वेबसाइट gate.iitb.ac.in वर अपलोड केले आहेत. उत्तरपत्रिका, प्रतिसाद पत्रिका व प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी थेट दुवे देण्यात आले आहेत.

GATE 2021 हरकती : आक्षेप नोंदवायचा कसा

ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती, त्यांना आता उत्तरपत्रिकेवर आक्षेप नोंदविण्याची संधी आहे. उत्तरपत्रिकेमधील एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे वाटत असल्यास, आपण आपल्या उमेदवारी लॉगिनद्वारे गेट वेबसाइटवर जाऊन त्यास ऑनलाइन आव्हान देऊ शकता.

हरकती करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रश्नासाठी 500 रुपये शुल्क द्यावे लागेल. जर आपला आक्षेप योग्य असेल, तर त्या प्रश्नाचे उत्तर बदलले जाईल. त्याचप्रमाणे सर्व आक्षेपांचे उत्तर दिल्यानंतर अंतिम उत्तरपत्रिका दिली जाईल, ज्या आधारे निकाल तयार करण्यात येईल.

स्पर्धा परीक्षा टॉप करण्याचा हा आहे सक्सेस फंडा, मिळवाल पैकीच्या पैकी गुण

GATE 2021 निकालाची तारीख : निकाल कधी येईल?

अंतिम उत्तरपत्रिकेच्या आधारे गेटचा निकाल 22 मार्च 2021 रोजी जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यापासून पुढील तीन वर्ष गेटची गुणसंख्या वैध राहील. याच्या आधारे अनेक नामांकित संस्थांमध्ये आयआयटी (IIT), आयआयएससी (IISc) अभियांत्रिकीच्या मास्टर कोर्समध्ये प्रवेश मिळतो. बर्‍याच कंपन्या, सरकारी विभाग आणि संस्था देखील गेट स्कोअर वापरतात.

देशभरातील विविध केंद्रांवर 6 ते 14 फेब्रुवारी 2021 रोजी ही परीक्षा घेण्यात आली.

  • आयआयटी बॉम्बेकडून गेटची उत्तरपत्रिका, प्रश्नपत्रिका आणि प्रतिसाद पत्रिका प्रसिद्ध.
  • परीक्षेच्या निकालाची तारीखही जाहीर