esakal | CBSE च्या विद्यार्थ्यांनाे! दहावी-बारावीच्या बाेर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदत वाढ? जाणून घ्या शेवटची तारीख
sakal

बोलून बातमी शोधा

CBSE च्या विद्यार्थ्यांनाे! दहावी-बारावीच्या बाेर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदत वाढ? जाणून घ्या शेवटची तारीख

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 4 मे ते 10 जून 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. 1 मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. 

CBSE च्या विद्यार्थ्यांनाे! दहावी-बारावीच्या बाेर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदत वाढ? जाणून घ्या शेवटची तारीख

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : CBSE Board Exams : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) खासगी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे. यामुळे अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप परीक्षेचा अर्ज भरलेला नाही, त्यांनी सीबीएसईच्या संकेतस्थळावर cbse.gov.in वर भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन करण्यात आले आहे. सीबीएसईची अर्ज भरण्यासाठीची लिंक 22 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान संध्याकाळी पाच वाजता उपलब्ध राहील. यापुर्वी अर्ज भरण्यासाठीची मुदत प्रक्रिया 22 फेब्रुवारी पर्यंत हाेती, परंतु आता 25 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

सीबीएसईने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "मागील वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी विनंती केली होती विशेषतः खासगी विद्यार्थी म्हणून दहावी आणि 12 वीचे परीक्षा फॉर्म भरू शकणार नाहीत. तरी त्यास मुदत वाढ मिळावी. सीबीएसईने आता तशी संधी उपलब्ध करुन दिली आहे. इच्छुकांनी ऑनलाईन फॉर्म भरावेत असे सांगितले आहे. दरम्यान ही शेवटची संधी असल्याचा निर्णय जाहीर असल्याचे नमूद केले आहे." 

सीबीएसई दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा चार मे ते 10 जून 2021 या कालावधीत घेण्यात येणार आहेत. एक मार्चपासून प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत असे ही सांगण्यात आले आहे.

परीक्षेचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी ही काळजी घ्यावी 

 • परीक्षेचा फॉर्म भरण्यापूर्वी उमेदवारांनी सर्व आवश्‍यक माहिती सज्ज ठेवावी.
   
 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर केला जाईल. कोणतीही हार्ड कॉपी सीबीएसईला पाठवावी लागणार नाही. 
   
 • उमेदवारांना फी भरावी लागेल. 
   
 • परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी पुढील मुदतवाढ दिली जाणार नाही. 
   
 • परीक्षा केंद्राचे शहर काळजीपूर्वक निवडा, कारण यापुढे कोणतेही बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही.  

Valentine's Day शिवाय 14 फेब्रुवारीला आणखी 14 महत्वाच्या घटना घडल्या आहेत, तुम्हाला माहितीय?

Mishri Milk Benefits : पुरुषांनी यावेळी करावे मिश्री दुधाचे सेवन, होतील 5 जबरदस्त फायदे

Valentines Day : तेरे संग यारा खुशरंग बहारा.. पाचगणी, महाबळेश्वरच्या सुखद गारव्यात व्यक्त करा प्रेम 

परदेशी पाहुण्यांना मायणी तलावाचा विसर; फ्लेमिंगोंची अद्याप गैरहजेरी

loading image
go to top