esakal | आईबीपीएसची परीक्षा दिली आहे? परीक्षेचे स्कोर कार्ड वेबसाईटवर उपलब्ध, इथे करा चेक आपला स्कोर

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News Satara News

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सेलेक्शनने नुकतेच लिपिक प्राथमिक परीक्षा 2020 चे गुणपत्रक जाहीर केले आहे.

आईबीपीएसची परीक्षा दिली आहे? परीक्षेचे स्कोर कार्ड वेबसाईटवर उपलब्ध, इथे करा चेक आपला स्कोर
sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

सातारा : इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सेलेक्शनने (आयबीपीएस) नुकतेच लिपिक प्राथमिक परीक्षा 2020 चे गुणपत्रक जाहीर केले असून लिपिक परीक्षेचे गुणपत्रक आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइटवरती उपलब्ध करण्यात आले आहे. दरम्यान, ऑनलाइन प्रीलिमिनरी परीक्षेत भाग घेतलेल्या उमेदवारांनी ibps.in वर जाऊन त्यांचे गुणपत्रक तपासू शकता. वेबसाइटवर 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत गुणपत्रिका उपलब्ध असेल, अशी माहिती इन्स्टिट्यूटच्या व्यवस्थापनाने दिली आहे.

असे तपासू शकता लिपिक प्राथमिक परीक्षेचे गुणपत्रक.. 

आयबीपीएस लिपिक ऑनलाइन प्रारंभिक परीक्षा स्कोअर कार्ड तपासण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ ibps.in वर भेट द्यावी. पुढे जावून मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या संबंधित परीक्षेसाठी आपले दृश्य पहावे व त्या दुव्यावर क्लिक करावे. आता एक नवीन टॅब उघडेल. येथे उमेदवार आपला नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि संकेतशब्द किंवा जन्मतारीख प्रविष्ट करुन लॉग इन करू शकतो. तद्नंतर आता आपले स्कोअर कार्ड स्क्रीनवर उघडेल, उमेदवाराने ते कार्ड पहावे व गुणपत्रक डाउनलोड करावे.

Good News : TCS ब्रिटनमध्ये करणार 1,500 तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरती

आयबीपीएस लिपिक प्रारंभिक परीक्षा 5, 12 डिसेंबर आणि 13 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात आली होती. त्याचा निकाल 6 फेब्रुवारी 2021 रोजी जाहीर झाला. आयबीपीएस परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेस हजेरी लावावी लागणार असून मुख्य परीक्षा 28 फेब्रुवारी 2021 रोजी होणार आहे. आयबीपीएसने 6 फेब्रुवारी रोजी मुख्य परीक्षेसाठी कॉल लेटर जाहीर केले असून ज्या उमेदवारांनी अद्याप कॉल लेटर डाउनलोड केलेले नाही, ते अधिकृत वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करू शकतात. वेबसाइटवर 28 फेब्रुवारीपर्यंत कॉल लेटर उपलब्ध असेल. दरम्यान, मार्च किंवा एप्रिल 2021 मध्ये मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता असल्याचे संबंधित व्यवसथापनाने सांगितले आहे.