संधी करिअरच्या... : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

National Institute of Design

भारतात १९४८च्या औद्योगिक धोरणानुसार लहान उद्योगांना चालना मिळावी तसेच मदत व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने १९६१मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेची सुरुवात अहमदाबाद येथे केली.

संधी करिअरच्या... : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन

- सविता भोळे

भारतात १९४८च्या औद्योगिक धोरणानुसार लहान उद्योगांना चालना मिळावी तसेच मदत व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारने १९६१मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन या संस्थेची सुरुवात अहमदाबाद येथे केली. नंतर या संस्थेचा विस्तार होऊन त्या भारतभर विविध ठिकाणी सुरू करण्यात आल्या. सध्या अहमदाबादसह कुरुक्षेत्र, विजयवाडा, बंगळूर, गांधीनगर, जोरहाट आणि भोपाळ अशा सात ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन सुरू आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन ही आंतरराष्ट्रीय स्तरावर औद्योगिक टेक्स्टाईल कम्युनिकेशन आणि डिझाइनसाठी शैक्षणिक तसेच संशोधन क्षेत्रात मान्यताप्राप्त संस्था आहे. भारत सरकारने २०१४च्या कायद्यानुसार या संस्थेला राष्ट्रीय महत्त्वाची संस्था म्हणून गौरविले आहे. भारत सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयानेही २०१५मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनला सांइटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणून गौरविले आहे. यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइन, अहमदाबाद ही भारतामध्ये सर्वांत प्रतिष्ठित डिझाइन स्कूल मानले जाते. युरोप आणि आशियातील पहिल्या २५ डिझाइन स्कूल्समध्ये तिचा समावेश आहे. येथे अनेक ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आणि डॉक्टरल प्रोग्रॅम्स राबविले जातात.

या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना भारत तसेच भारताबाहेरील मल्टी नॅशनल कंपन्यांमध्ये उत्तम पगाराच्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनमध्ये प्रवेश घेण्यासाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा (DAT-Design Apptitude Test) घेतली जाते.

ही परीक्षा दोन टप्प्यांत होते.

  • प्रिलिमिनरी

  • मेन्स

संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करून या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले जाते. भारतातील १२ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाते. पदवी तसेच पदव्युत्तर कोर्सेससाठी स्वतंत्रपणे DAT घेतली जाते तर PhD च्या प्रवेशासाठी DRT (Design Research Test) स्वतंत्ररीत्या घेतली जाते.

अहमदाबाद येथील कोर्सेस

1) B.Des इन ॲनिमेशन फिल्म डिझाइन

कालावधी - ४ वर्षे

पात्रता - बारावी उत्तीर्ण

प्रवेश परीक्षा - NID- DAT

हा कोर्स याशिवाय १) ग्राफिक डिझाइन २) फर्निचर अँड इंटिरियर डिझाइन ३) प्रॉडक्ट डिझाइन ४) फिल्म अँड व्हिडिओ कम्युनिकेशन ५) टेक्स्टाइल डिझाइन ६) एक्झिबिशन डिझाइन ७) सिरॅमिक अँड ग्लास डिझाइन अशा एकूण ८ विषयांमध्ये येथे उपलब्ध आहे.

2) M.Des इन ॲनिमेशन फिल्म डिझाइन

कालावधी - २ वर्षे

पात्रता - कोणत्याही विषयातील पदवी

प्रवेश परीक्षा - NID-DAT

पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स १) फर्निचर अँड इंटिरिअर डिझाइन २) डिझाइन फॉर रिटेल ३) एक्सपिरीअन्स इंटर अॅक्शन डिझाइन ४) फोटोग्राफी डिझाइन ५) टेक्स्टाइल डिझाइन ६) अपरोल डिझाइन ७) डिजिटल गेम डिझाइन ८) ग्राफिक डिझाइन ९) लाइफस्टाइल ॲसेसरी डिझाइन १०) प्रॉडक्ट डिझाइन ११) टॉय अँड गेम डिझाइन १२) सेरमिक अँड ग्लास डिझाइन १३) फिल्म अँड व्हिडिओ कम्युनिकेशन १४) इन्फॉर्मेशन डिझाइन १५) न्यू मीडिया डिझाइन

3) Ph.D

कालावधी - ३ ते ५ वर्षे

पात्रता - त्या त्या क्षेत्रातील मास्टर डिग्री

प्रवेश परीक्षा - स्क्रिनिंग, DRT, Interview.

हा कोर्स डिझाइन एज्युकेशन, सोशल इन्हवेशन, डिझाइन इनोव्हेशन या विषयांमध्ये उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी विद्यार्थी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. संकेतस्थळ- www.nid.edu

Web Title: Savita Bhole Career Opportunity National Institute Of Design

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top