करिअर घडविताना : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

career

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज(IIPS) ही संस्था ESCAP रिजनमधील देशांसाठी लोकसंख्येच्या अभ्यासातील प्रशिक्षण व संशोधनासाठी प्रमुख प्रादेशिक संस्था म्हणून नावाजलेली आहे.

करिअर घडविताना : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज

- सविता भोळे

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज(IIPS) ही संस्था ESCAP रिजनमधील देशांसाठी लोकसंख्येच्या अभ्यासातील प्रशिक्षण व संशोधनासाठी प्रमुख प्रादेशिक संस्था म्हणून नावाजलेली आहे. या संस्थेची स्थापना १९५६मध्ये सर दोराबजी टाटा ट्रस्ट, भारत सरकार व युनायटेड नेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे करण्यात आली. सुरुवातीला तिचे नाव डेमोग्रफिक ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर (DTRC)असे होते. परंतु १९८५मध्ये ते बदलून इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन स्टडीज असे करण्यात आले. संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला गेला. भारत सरकारने IIPS ला नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे (NFHS) साठी समन्वयक व तांत्रिक मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. भारत सरकारच्या हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर या मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली ही संस्था कार्यरत आहे.

प्रशिक्षण व संशोधन याशिवाय ही संस्था अनेक शासकीय संस्थांसाठी तसेच स्वयंसेवी संस्थांसाठी कन्सल्टन्सी सेवा पुरवत असते. अनेक वर्षांपासून संस्था लोकसंख्या आणि आरोग्य अभ्यासासाठी प्रोफेशनल्स तयार करण्यात केंद्रबिंदू म्हणून कार्य करीत आहे. गेल्या ५३ वर्षांमध्ये आशिया आणि पॅसिफिक रिजन तसेच आफ्रिका आणि नॉर्थ अमेरिकेतील जवळ जवळ ४२ हून अधिक देशांमधील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याचे मोलाचे कार्य संस्थेने केले आहे. या संस्थेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी हे विविध देशातील लोकसंख्या आणि आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सरकारी संस्थांमध्ये कार्यरत आहेत. तसेच अनेक विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्येही खूप महत्त्वाची पदे भूषवीत आहेत.

उपलब्ध असलेले महत्त्वाचे कोर्स

संस्थेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन तसेच ऑफलाइन अर्ज संस्थेच्या ऑफिशियल पोर्टलवर भरावयाचा असतो. कोणत्याही कोर्सला प्रवेश घेण्यासाठी संस्थेतर्फे ऑनलाइन प्रवेश परीक्षा घेतली जाते.

 • मास्टर ऑफ पॉप्युलेशन स्टडीज आणि एम. फिल.ला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेतून निवड झाल्यावर मुलाखती घेऊन नंतर प्रवेश मिळतो.

 • पीएच.डी., इंटिग्रेटेड एम फिल, पीएच.डी. आणि पोस्ट डॉक्टरल फेलोशिप प्रोग्रॅम या कोर्सेसला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेची प्रवेश परीक्षा, लेखी परीक्षा (रिसर्च प्रपोजल) आणि वैयक्तिक मुलाखत यामधून प्रवेश मिळतो.

 • पार्ट टाइम पीएच.डी. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पाच वर्षांचा या क्षेत्रातील अनुभवासह ऑफलाइन प्रवेश परीक्षा देऊन प्रवेश मिळतो.

1) एम. ए. (पॉप्युलेशन स्टडीज)

 • कालावधी - २ वर्षे

 • पात्रता - पदवी

 • प्रवेश परीक्षा - Online entrance of institute.

2) मास्टर ऑफ पॉप्युलेशन स्टडीज (MPS)

 • कालावधी - एक वर्ष

 • पात्रता - पदवी

 • प्रवेश परीक्षा - Online entrance+Interview

3) मास्टर ऑफ सायन्स (M. SC.)

 • कालावधी - २ वर्षे

 • पात्रता - पदवी

 • प्रवेश परीक्षा - Online entrance

हा कोर्स १) बायो स्टॅटिस्टिक्स अँड डेमोग्राफी

२) पॉप्युलेशन स्टडीज या २ विषयात उपलब्ध आहे.

4) मास्टर ऑफ फिलॉसॉफी (M.Phil)

 • कालावधी - १ वर्ष

 • पात्रता - विषयातील पोस्ट ग्रॅज्युएशन

 • प्रवेश परीक्षा - Online entrance + Interview

हा कोर्स १) बायो स्टॅटिस्टिक्स अँड डेमोग्राफी

२)पॉप्युलेशन स्टडीज या २ विषयात उपलब्ध.

5) पीएच. डी. (Ph.D.)

 • कालावधी - ३ वर्षे

 • पात्रता - त्या-त्या विषयातील पोस्ट ग्रॅज्युएशन

 • प्रवेश परीक्षा - Online entrance+Written exam+Interview

हा कोर्स १) बायो स्टॅटिस्टिक्स

२) पॉप्युलेशन स्टडीज

३) डेमोग्राफी या विषयात उपलब्ध आहे.

6) इंटिग्रेटेड एम. फिल./पीएच. डी. (M.Phil. + Ph.D.)

 • कालावधी - ३ वर्षे

 • पात्रता - त्या-त्या विषयातील पोस्ट ग्रॅज्युएशन

 • प्रवेश परीक्षा - Online entrance+Written Exam+Interview

7) पोस्ट डॉक्टरल फेलोशिप प्रोग्रॅम

 • कालावधी - १ वर्ष

 • पात्रता - पीएचडी इन पॉप्युलेशन स्टडीज

 • प्रवेश परीक्षा - Praposal Presentation +Interview.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

संकेतस्थळ - https://www.iipsindia.ac.in

Web Title: Savita Bhole Writes Career International Institute For Population Studies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationjobCareer
go to top