संधी करिअरच्या... : इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेन्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

career opportunity
संधी करिअरच्या... : इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेन्ट

संधी करिअरच्या... : इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेन्ट

- सविता भोळे

इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंट (आयआयएमएस) या केंद्र सरकारने मॅनेजमेंट या क्षेत्राकरिता चालविलेल्या सार्वजनिक बिझनेस स्कूल्स आहेत. नियोजन आयोगाने सुचविल्याप्रमाणे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज सुरुवातीला कोलकता व अहमदाबाद येथे १९६१मध्ये सुरू करण्यात आल्या. देशभरात गरजेप्रमाणे अहमदाबाद, बंगळूर, कोझिकोडे, इंदूर, शिलाँग, रायपूर, रांची, रोहतक, काशीपूर, तिरुचिरापल्ली, उदयपूर, अमृतसर, बोधगया, नागपूर संबलपूर, सिर्मुर, विशाखापट्टण व जम्मू या ठिकाणी ‘आयआयएमएस’ची व्याप्ती पसरलेली आहे.

पूर्णवेळ असलेला मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (MBA) हा प्रमुख कोर्स म्हणून उपलब्ध आहे. त्याशिवाय मॅनेजमेंट क्षेत्रातील अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, डॉक्टरल आणि एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम राबविले जातात. यातील काही कोर्सेस हे सर्व ‘आयआयएमएस’ तर काही विशिष्ट उद्देशाने काही युनिक कोर्सेसही राबविले जातात.

१) पोस्ट ग्रॅज्युएट मॅनेजमेंट प्रोग्रॅम (PGP/MBA)

 • कालावधी- २ वर्षे

 • पात्रता - कोणतीही पदवी

 • प्रवेश परीक्षा -CAT/GMAT

‘आयआयएमएस’मध्ये प्रवेश घेण्यासाठी CAT किंवा GMAT चा स्कोअर खूप जास्त असावा लागतो. (९९.६ टक्क्यांपर्यंत)

२) वन इयर MBA

जागतिक पातळीवर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी २००६ पासून एक वर्षाचा एमबीए कोर्स व्यावसायिक अनुभवासाठी सुरू केला. हा कोर्स अहमदाबाद, बंगळूर, कोलकता, इंदूर, कोझिकोडे, शिलॉँग व उदयपूर येथे सुरू आहे.

 • कालावधी - एक वर्ष

 • पात्रता - कोणतीही पदवी + ५ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव.

 • प्रवेश परीक्षा - GMAT+ essays + Interview

दोन वर्षांचा एमबीए कोर्स हा विशेषतः नुकतीच पदवी प्राप्त झालेल्यांसाठी तर एक वर्षाचा एमबीए कोर्स हा पाच वर्षांपेक्षा जास्त व्यावसायिक अनुभवी व्यक्तींसाठी डिझाईन केला आहे.

३) स्पेशालिटी फूल टाइम एमबीए प्रोग्रॅम्स

अनेक ‘आयआयएमएस’मध्ये वैशिष्ट्यपूर्ण एमबीए कोर्सेस वेगवेगळ्या विषयांकरिता डिझाईन करून चालवले जातात. ज्यामध्ये

1) पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन सस्टेनेबल मॅनेजमेंट (PGP-SM) हा लखनौ येथे चालवला जातो.

2) पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट (PGP-HRM) हा रांची येथे चालवला जातो.

3) पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन फूड अँड अग्री बिझनेस मॅनेजमेंट (PGP-FABM) हा अहमदाबाद येथे चालविला जातो. यासारख्या विविध कोर्सेसचा समावेश आहे.

 • कालावधी दोन वर्षे

 • पात्रता - पदवी (५० टक्के गुणांसह)

 • प्रवेश परीक्षा - CAT/GMAT/XAT

४) ५ इअर इंटिग्रेटेड मॅनेजमेंट प्रोग्रॅम (IPM)

इंदूर, रोहतक, जम्मू, बोधगया आणि रांची येथे हा कोर्स चालवला जातो.

 • कालावधी - पाच वर्षे

 • पात्रता - बारावी

 • प्रवेश परीक्षा - IPM-AT

याच कोर्सला BBA+MBA असेही काही ठिकाणी म्हटलं जातं.

५) फेलो प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट (DBA)

व्यवस्थापनाच्या विविध शाखांमध्ये शिक्षक म्हणून शिकविण्यासाठी तसेच या क्षेत्रातील संशोधनासाठी फेलो प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट हा कोर्स सुरू केला गेला. कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना डॉक्टरल स्कॉलर असे म्हटले जाते व ‘फेलो मेंबर ऑफ IIMs’ म्हणून गौरविले जाते.

 • कालावधी - ४.५ वर्षे

 • पात्रता - PGP/MBA

 • प्रवेश परीक्षा - GMAT/CAT/GATE/UGCNET

६) एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट प्रोग्रॅम (Exececutive MBA)

अनेक आयआयएमएसमध्ये हा कोर्स ‘वर्किंग प्रोफेशनल्स’साठी राबविला जातो. यामध्ये कमी कालावधी किंवा अर्धवेळ कोर्सेसचा समावेश असतो. वेगवेगळ्या ठिकाणी हा कोर्स मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम(MDP), ॲडव्हान्स मास्टर्स प्रोग्रॅम इन मॅनेजमेंट ऑफ ग्लोबल एंटरप्राइजेस (AMPM)आणि एक्झिक्युटिव्ह जनरल मॅनेजमेंट प्रोग्रॅम (EGMP). या नावाने आहे.

‘आयआयएमएस’मध्ये उपलब्ध असलेले सर्टिफिकेट कोर्सेस एक्झिक्युटिव्ह-एमबीएच्या समकक्ष नाहीत. मात्र पूर्ण वेळ डिप्लोमा लेव्हल प्रोग्रॅम्सच्या समकक्ष मानले जातात.

७) इतर कोर्सेस...

काही ‘आयआयएमएस’मध्ये विविध मॅनेजमेंट क्षेत्रांसाठी स्पेशल कोर्सेस राबविले जातात. अहमदाबाद येथे लष्करातील कर्मचाऱ्‍यांसाठी सहा महिन्यांचा पूर्णवेळ असणारा, आर्म्ड फोर्सेस प्रोग्रॅम(AFM) उपलब्ध आहे. तर येथे बंगळूर येथे आयएएस उमेदवारांसाठी पोस्ट ग्रॅज्युएटप्रोग्रॅम इन पब्लिक मॅनेजमेंट अँड पोलिसी (PGP PMP)आणि पोस्टग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन पब्लिक पोलिसी मॅनेजमेंट(PGP PPM) हे कोर्सेस उपलब्ध आहेत.

बंगलोर येथेच सॉफ्टवेअर आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी ‘पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम सॉफ्टवेअर एंटरप्राइझ मॅनेजमेंट’(PGP SEM) हे कोर्सेसही उपलब्ध आहेत.

रांची येथे एकमेव पूर्ण वेळ असलेला पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट (PGD HRM) हा कोर्स उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी त्या-त्या ‘आयआयएमएस’च्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी.

Web Title: Savita Bhole Writes Career Opportunity Indian Institute Of Management

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top