वाटा करिअरच्या : राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युथ डेव्हलपमेंट

राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युथ डेव्हलपमेंट ही राष्ट्रीय महत्त्वाची संस्था तमिळनाडूमध्ये श्रीपेरंबदूर येथे १९९३मध्ये सुरू करण्यात आली.
Career
CareerSakal
Summary

राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युथ डेव्हलपमेंट ही राष्ट्रीय महत्त्वाची संस्था तमिळनाडूमध्ये श्रीपेरंबदूर येथे १९९३मध्ये सुरू करण्यात आली.

- सविता भोळे

राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ युथ डेव्हलपमेंट ही राष्ट्रीय महत्त्वाची संस्था तमिळनाडूमध्ये श्रीपेरंबदूर येथे १९९३मध्ये सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाच्या अंतर्गत ही संस्था कार्यरत असून देशभरातील NSS, NYKS आणि इतर युवा संघटनांच्या प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यासाठी सहकार्य करते. तसेच ही संस्था युथ डेव्हलपमेंट क्षेत्रातील संशोधन आणि प्रशिक्षण राज्यातील तरुण संघटनांच्या अधिकाऱ्यांसाठी घेत असते.

ही संस्था मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्टससाठी तसेच विविध तरुणांच्या युवक संघटनांसाठी थिंक टँक म्हणून कार्य करते.

देशातील तरुणांच्या क्षमता वाढविण्यासाठी कार्य करणारी ही अशा प्रकारची पहिली संस्था आहे. तसेच या संघटनेने सर्वात पहिल्यांदा ‘भारतीय युवा विकास निर्देशांक’ तयार केला.

या संस्थेतर्फे जेंडर स्टडीज, डेव्हलपमेंट स्टडीज, लोकल गव्हर्नन्स, कौन्सिलिंग सायकॉलॉजी, सोशल इनोव्हेशन इंटरप्रेनेऊरशिप आणि सोशल वर्क या विषयातील पोस्ट ग्रज्युएट प्रोग्रॅम तसेच सोशल सायन्सच्या विविध शाखांतील पीएचडी प्रोग्रॅम राबवले जातात.

या संस्थेमधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना विविध स्वयंसेवी संघटनांमध्ये तसेच औद्योगिक क्षेत्रातही चांगल्या पगाराच्या संधी उपलब्ध असतात.

उपलब्ध असलेले महत्त्वाचे कोर्सेस

१) बॅचलर ऑफ व्होकेशनल (B.Voc)

  • कालावधी - ३ वर्षे

  • पात्रता - १०+ २ उत्तीर्ण. प्रवेश परीक्षा नाही

परंतु मेरीट व मुलाखतीमार्फत प्रवेश मिळतो.

हा कोर्स १) ॲपल मॅन्युफॅक्चरिंग अँड इंटरप्रेनेऊरशिप

२) फॅशन डिझाईन अँड रिटेल या दोन विषयात चालविला जातो.

२) एमएस्सी (M.Sc in Counselling Psycology)

  • कालावधी - २ वर्ष

  • पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी (५० टक्के गुणांसह)

  • प्रवेश परीक्षा - संस्थेची स्वतंत्र प्रवेश परीक्षा व गटचर्चा

३) एम.ए (M.A.)

  • कालावधी - २ वर्षे

  • पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी (५० टक्के गुणांसह)

प्रवेश परीक्षा संस्थेची स्वतंत्र प्रवेश परीक्षा व गटचर्चा

हा कोर्स १) डेव्हलपमेंट पॉलिसी अँड प्रॅक्टिस,

२) जेंडर स्टडीज

३) लोकल गव्हर्नन्स

४) सोशल इनोव्हेशन अँड इंटरप्रेनेऊरशिप अशा चार विषयांमध्ये राबवला जातो.

४) एम.एस.डब्ल्यू इन युथ अँड कम्युनिटी डेव्हलपमेंट (M.S.W.)

  • कालावधी - २ वर्षे

  • पात्रता - कोणत्याही शाखेतील पदवी (५० % गुणांसह) प्रवेश परीक्षा संस्थेची स्वतंत्र प्रवेश परीक्षा व गटचर्चा

५) पीएचडी (Ph.D)

  • कालावधी - ३ वर्षे

  • पात्रता - त्या-त्या विषयातील पदव्युत्तर शिक्षण (किमान ५५ टक्के) गुणांसह प्रवेश परीक्षा संस्थेची स्वतंत्र प्रवेश परीक्षा किंवा UGC, JRF/SLET/SET उत्तीर्ण विद्यार्थी.

हा कोर्स १) अप्लाईड सायकॉलॉजी

२) जेंडर स्टडीज ३) डेव्हलपमेंट स्टडीज ४) सोशल वर्क

५) सोशल इंजिनिअरिंग ६) लोकल गव्हर्नन्स.

या सहा विषयांसाठी राबवला जातो. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी. संकेतस्थळ - www.rjniyd.gov.in

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com