
SBI Vacancy : एसबीआयमध्ये ८७७ पदांवर भरती; ४५ हजारांपर्यंत मिळणार पगार
मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने सपोर्ट ऑफिसरसह विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण ८७७ पदे भरली जातील. जे उमेदवार या पदांच्या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र आहेत ते अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट देऊन अर्ज भरू शकतात.
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १ एप्रिल २०२३ पर्यंत वेळ देण्यात आला आहे. अर्ज करण्यापूर्वी भरतीचे तपशील तपासा. (SBI SO Recruitment 2023) हेही वाचा - एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
रिक्त जागांचा तपशील
या SBI भरतीसाठी एकूण ८७७ पदे भरली जातील.
महत्त्वाची तारीख
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्यासाठी १ एप्रिल २०२३ पर्यंत वेळ देण्यात येईल. (job for senior citizen)
शैक्षणिक पात्रता
अर्ज करू इच्छिणारे सर्व उमेदवार SBI चे सेवानिवृत्त अधिकारी असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षांपेक्षा जास्त नसावी.
पगार
या पदांवर निवड झालेल्या उमेदवारांना ४० हजार ते ४५ हजार रुपये वेतन दिले जाईल.
असा करा अर्ज
१. - अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट www.sbi.co.in ला भेट द्यावी.
२. - दुसऱ्या स्टेपमध्ये वेबसाईटच्या होमपेजवर Apply Online च्या लिंकवर क्लिक करा.
३. - लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमचा अर्ज भरा.
४. - फॉर्म भरल्यानंतर, कागदपत्रे सबमिट करा आणि अर्ज फी भरा.
५. - शेवटी भविष्यातील वापरासाठी हार्ड कॉपी ठेवा.