महाविद्यालय आणि प्लेसमेंट 

शीतलकुमार रवंदळे
Thursday, 23 January 2020

भारताला महासत्ता बनायचे असल्यास स्वयंरोजगाराचे प्रमाण येत्या काही वर्षात १० ते १५ टक्‍क्यांपर्यंत पोचायला हवे. यासाठी पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

संधी नोकरीच्या 
भारताला महासत्ता बनायचे असल्यास स्वयंरोजगाराचे प्रमाण येत्या काही वर्षात १० ते १५ टक्‍क्यांपर्यंत पोचायला हवे. यासाठी पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. माझा पाल्य १० ते ५ नोकरी करून सायंकाळी घरी यावा व साधे, सहज, चढ-उतार नसलेले शांत जीवन जगावे ही पालकांची माफक अपेक्षा असते. मात्र  ‘More Risk... More Money  व No Risk... No Money’ हा फंडा समाजात रुजत नाही, तोपर्यंत पालक विद्यार्थ्यांची इच्छा मारून त्यांना स्वयंरोजगाराऐवजी नोकरीकडे ढकलण्याचा प्रयत्न करत राहणार. याउलट आजकालच्या विद्यार्थ्यांना करिअरचा चॉईस विचारल्यास ‘स्वयंरोजगार’ निवडू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. मात्र, परिस्थिती व संधीअभावी विद्यार्थी इच्छा असूनही स्वयंरोजगाराच्या वाटेपासून दूर जातात. यात समाजाच्या मानसिकतेनेही खूप मोठा प्रभाव पडतो. अमेरिकेतील स्टॅनफोर्डसारख्या जगातील नावाजलेल्या विद्यापीठात ७० ते ७५ टक्के विद्यार्थ्यांना टेक्नॉलॉजीतील उद्योजक बनण्याची इच्छा असते आणि त्यादृष्टीने तयारी करून त्यातील बरेचसे विद्यार्थी उद्योजक बनतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाविद्यालयांसाठी प्लेसमेंटचे महत्त्व :

कॅम्पस प्लेसमेंटमधून एखाद्या विद्यार्थ्यास चांगल्या कंपनीत नोकरी लागल्यास त्याच्यासह संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल होते. समाजातील स्थान (स्टेट्स), आर्थिक उत्पन्न, जीवनशैली यातदेखील मोठा बदल होतो.
 
विद्यार्थ्यांचा आत्मविश्‍वास वाढल्यामुळे इतर क्षेत्रांतही यश मिळण्याची शक्यता वाढते. 
हातात चांगला पैसा असल्यामुळे तो विद्यार्थी-विद्यार्थिनी गरीब कुटुंबातील असल्यास आपल्या लहान भावंडांना चांगल्या उत्तम दर्जाच्या शाळेत टाकतो. 

कुठल्याही महाविद्यालयाचे आर्थिक गणित त्यात प्रवेशासाठी उपलब्ध असणाऱ्या जागा व प्रत्यक्षात होणारे प्रवेश आणि रिक्त जागा यावरच अवलंबून असते. ॲडमिशन घेताना विद्यार्थी व पालकांकडून होणारी विचारणा ः

 कॉलेजमध्ये प्लेसमेंटचे परसेंटेज किती? 
 सर्वांत जास्त पगार किती? 
 सर्वसाधारण पगार किती? 
 कोअर व आयटी प्रॉडक्ट कंपन्यांतील प्रमाण किती? 
 प्लेसमेंटच्या प्रामुख्याने क्वालिटी प्लेसमेंट (पगार व चांगला जॉब प्रोफाईल म्हणजेच टेक्निकल जॉब प्रोफाईल) तसेच क्वॉंटिटी प्लेसमेंटचे प्रमाण (किती विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या) किती? 

महाविद्यालयाचे आउटपुट कुठल्या क्वालिटीचे आहे हे प्रामुख्याने प्लेसमेंटच्या आकड्यांवरून ठरते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sheetalkumar ravandale article College and Placement

Tags
टॉपिकस
Topic Tags: