esakal | "नेव्ही'मध्ये सुरू होणार विविध पदांसाठी भरती प्रक्रिया ! "या' दिवसापासून करा अर्ज
sakal

बोलून बातमी शोधा

Navy

"नेव्ही'मध्ये सुरू होणार विविध पदांसाठी भरती प्रक्रिया ! "या' दिवसापासून करा अर्ज

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : इंडियन नेव्हीमध्ये नौसैनिक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी. 2021 मध्ये नौसैनिक (सेलर्स) भरतीसाठी नौदलाकडून एक अपडेट प्रसिद्ध करण्यात आला आहे. भरती पोर्टल joinindiannavy.gov.in वर भारतीय नौदलाने जाहीर केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, सेलर्स एंट्री - एए-150 आणि एसएसआर-02/2021 बॅचसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 26 एप्रिलपासून सुरू होऊ शकेल, जी 30 एप्रिलपर्यंत चालणार आहे. प्रत्येक वर्षी आर्टिफिशर ऍप्रेंटिस (एए) आणि सिनिअर सेकंडरी रिक्रुट्‌स (एसएसआर) म्हणून नियुक्त केले जाते.

काय आहेत पात्रतेचे निकष?

नेव्ही सेलर्स एंट्री अंतर्गत आर्टिफिशर ऍप्रेंटिस भरतीसाठी तेच उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांना गणित व भौतिकशास्त्र विषयांसह केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा केंद्रीय किंवा राज्य मान्यताप्राप्त मंडळाकडून कॉम्प्युटर सायन्स विषयात किमान 60 टक्के गुणांसह 10 +2 परीक्षा पास असावा. तसेच, उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या तारखेनुसार 17 वर्षांपेक्षा कमी आणि 20 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

तसेच सिनिअर सेकंडरी रिक्रुट्‌स (एसएसआर) भरतीसाठी गणित व फिजिक्‍स विषयासह केमिस्ट्री किंवा बायोलॉजी किंवा कॉम्प्युटर सायन्ससह किमान 60 टक्के गुणांसह 10 + 2 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. तसेच, उमेदवाराचे वय अर्ज करण्याच्या तारखेनुसार 17 वर्षांपेक्षा कमी आणि 20 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

अशी होईल निवड

भारतीय सैन्यात आर्टिफिशर ऍप्रेंटिस आणि सिनिअर सेकंडरी रिक्रुट्‌स (एसएसआर) भरतीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाते. नेव्हीकडून देशभरातील 31 परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षेत यशस्वी घोषित केलेल्या उमेदवारांना गुणवत्तेनुसार शारीरिक तपासणीसाठी आमंत्रित केले जाते. केवळ या टप्प्यात यशस्वी घोषित उमेदवारांना वैद्यकीय तपासणीसाठी आमंत्रित केले जाते.

loading image