esakal | UPSC ESE 2021 : इंजिनिअरिंग सेवा प्रारंभिक परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस
sakal

बोलून बातमी शोधा

UPSC

UPSC ESE 2021 : इंजिनिअरिंग सेवा प्रारंभिक परीक्षेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : संघ लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) 7 एप्रिल 2021 रोजी अभियांत्रिकी सेवा (प्रारंभिक) परीक्षा 2021 साठी अधिसूचना जारी करून अर्ज मागविले होते. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 7 एप्रिलपासूनच सुरू झाली. अर्ज करण्याची शेवटची तारीख आज (27 एप्रिल) आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आता यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर भेट देऊन उशीर न करता अर्ज करावा.

27 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्जाची विंडो खुली असेल. यानंतर ऍप्लिकेशन विंडो बंद होईल. प्राथमिक परीक्षा 18 जुलै 2021 रोजी घेण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 215 रिक्त पदे भरली जाणार आहेत. तपशीलवार माहितीसाठी आपण अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन सूचना तपासू शकता.

जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा

मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्थांकडून अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे ते उमेदवार इंजिनिअरिंग सेवा परीक्षेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. शैक्षणिक पात्रतेच्या तपशिलासाठी आपण सूचना तपासू शकता. त्याचबरोबर उमेदवारांची वयोमर्यादा 21 ते 30 वर्षे निश्‍चित केली आहे. म्हणजेच, उमेदवार 2 जानेवारी 1991 पूर्वी आणि 1 जानेवारी 2000 नंतर जन्मलेला असावा.

असे करा ऑनलाइन अर्ज

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर upsconline.nic.in भेट द्यावी.

  • यानंतर मेन पेजवर उपलब्ध संघ लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांच्या ऑनलाइन अर्ज लिंकवर क्‍लिक करा.

  • आता आपल्यासमोर नवीन पेज ओपन होईल.

  • इंजिनिअरिंग सेवा प्राथमिक परीक्षा 2021 साठी नोंदणी लिंक येथे उपलब्ध आहे.

  • उमेदवारांना दोन भागात नोंदणी करावी लागेल. वेबसाइटवर दिलेल्या सूचना अर्ज करण्यापूर्वी योग्य रीतीने वाचाव्यात.

loading image