Best Brand Award : SRM युनिव्हर्सिटी-AP ला बेस्ट ब्रँड अवॉर्ड 2022

इकॉनॉमिक टाइम्स बेस्ट ब्रँड कॉन्क्लेव्हमध्ये SRM युनिव्हर्सिटी-AP ला बेस्ट ब्रँड पुरस्कार
SRM
SRMsakal

SRM युनिव्हर्सिटी-AP ला 20 डिसेंबर 2022 रोजी ताज लँड्स एंड, मुंबई येथे आयोजित इकॉनॉमिक टाइम्स बेस्ट ब्रँड कॉन्क्लेव्हच्या पाचव्या आवृत्तीत प्रतिष्ठित 'बेस्ट ब्रँड अवॉर्ड 2022' प्रदान करण्यात आला आहे.

मॅरिकोचे अध्यक्ष श्री हर्ष सी मारीवाला यांनी हा पुरस्कार रजिस्ट्रार डॉ आर प्रेमकुमार यांना सुपूर्द केला; प्रो. भारध्वज शिवकुमारन, डीन, पारी स्कूल ऑफ बिझनेस; आणि श्री पंकज बेलवारीर, डायरेक्टर, कम्युनिकेशन्स, एसआरएम एपी.

हा पुरस्कार अशा ब्रँड्सना दिला जातो ज्यांनी त्यांच्या सध्याच्या संरचनेत बदल केला आहे, भविष्यातील कृतीचा मार्ग निश्चित केला आहे आणि सतत नवनवीन उपक्रम करून आपल्या ग्राहकांना उत्तम दिले आहे.

“एसआरएम युनिव्हर्सिटी-एपीने शिक्षण उद्योगात अल्पावधीतच एक उत्तम ब्रँड मूल्य स्थापित केले आहे. सर्वोत्कृष्ट ब्रँड अवॉर्ड 2022 हा संस्थेसाठी एक मोठा सन्मान आहे, आणि आम्ही पुढील अनेक वर्षे ही ओळख समृद्ध करण्याचा आणि टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करू,” असे प्रा. मनोज के अरोरा, कुलगुरू, एसआरएम एपी यांनी सांगितले.

2021-2022 या आर्थिक वर्षातील अग्रगण्य ब्रँड ओळखण्यासाठी, इकॉनॉमिक टाईम्सने काही नॉलेज पार्टनरने सुचवलेल्या मापकांप्रमाणे संशोधन केले. ज्यामध्ये ब्रँड व्हॅल्यू, अस्तित्वाची वर्षे, वार्षिक उलाढाल, किमान वाढीचा दर, ब्रँड रिकॉल व्हॅल्यू आणि कर्मचाऱ्यांची संख्या यांचा समावेश होतो तसेच इतर उल्लेखनीय कामगिरीनुसार ब्रँडचे मूल्यांकन केले गेले आणि निवडले गेले.

SRM युनिव्हर्सिटी-AP ची 2022 च्या इकॉनॉमिक टाइम्स सर्वोत्कृष्ट ब्रँड्सपैकी एक म्हणून निवड करण्यात आली आहे आणि त्यांना प्रशंसेचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

या गौरवशाली पुरस्कार सोहळ्यात उल्लेखनीय ब्रँड्सचा समावेश होता ज्यांनी भारत आणि जागतिक बाजारपेठेतील त्यांचा वारसा आणि टिकाऊपणाद्वारे संबंधित क्षेत्रातील बेंचमार्कची नव्याने व्याख्या केली आहे.

या प्रसंगी सर्वोत्कृष्ट ब्रँड्सचा उत्सव साजरा करण्यासाठी मार्केटिंग गुरू, ब्रँड कस्टोडियन, ब्रँड मालक आणि सर्वोत्कृष्ट क्रिएटिव्ह लीडर्सना एका प्लॅटफॉर्मवर एकत्र आणले होते.

यावेळी या यशस्वी ब्रँड्सविषयी अधिक काही समजून घेता आले.

The Economic Times Best Brands Coffee Table Book च्या 5 व्या आवृत्तीचे प्रकाशही करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com