admission
admission sakal

अभियांत्रिकीच्या पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना १० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

‘सीईटी सेल’तर्फे सुधारित वेळापत्रक जाहीर


पुणे : अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आता १० डिसेंबरपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत. त्यानंतर प्रवेशाची दुसरी फेरी सुरू होणार असून दुसऱ्या फेरीतील गुणवत्ता यादी १७ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) या प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक मंगळवारी सायंकाळी प्रसिद्ध केले आहे.

अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेतंर्गत पहिल्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मंगळवारपर्यंतची मुदत दिली होती. दरम्यान, या प्रवेश प्रक्रियेतंर्गत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्याची मागणी होऊ लागली. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अभियांत्रिकी प्रवेशाच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिल्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर सीईटी सेलने प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना येत्या शुक्रवारी (ता. १०) सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे.

admission
पोस्टरबाजी करणाऱ्यांविरुद्ध बारामतीत गुन्हा दाखल होणार

त्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांचा तपशील १२ डिसेंबर रोजी जाहीर केला जाईल.तर या फेरीसाठी अर्ज करणे, पर्याय निवडणे यासाठी १३ ते १५ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. दुसऱ्या फेरीतील तात्पुरती (प्रोव्हिजनल) निवड यादी १७ डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १८ ते २१ डिसेंबरपर्यंतचा कालावधी दिला आहे. त्यानंतर संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रिया सुरू होईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.

*अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाचे सुधारित वेळापत्रक पाहण्यासाठी संकेतस्थळ : http://cetcell.mahacet.org

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com