MPSC : राज्य सेवा (मुख्य) परीक्षेचा निकाल जाहीर; प्रमोद चौगुले राज्यातून प्रथम

State Service (Main) Exam Final Result Published
State Service (Main) Exam Final Result PublishedState Service (Main) Exam Final Result Published

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ४, ५ व ६ डिसेंबर २०२१ रोजी घेतलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२० चा अंतिम निकाल दिनांक मंगळवारी (ता. ३१) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यानुसार एकूण दोनशे पदावर उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे. (State Service (Main) Exam Final Result Published)

या परीक्षेमध्ये प्रमोद बाळासो चौगुले (बैठक क्रमांक PN005337) हा राज्यातून सर्वसाधारण उमेदवारांमधून, रूपाली गणपत माने बैठक क्रमांक (PN002157) या महिलांमधून तर गिरीश विजयकुमार परेकर (बैठक क्रमांक PN002362) हा मागासवर्ग उमेदवारांमधून राज्यात प्रथम आला आहे.

परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २९ एप्रिल २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. गुणवत्ता यादीमधील समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांबाबत प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीच्यावेळी अस्तित्वात असलेल्या नियमानुसार कार्यवाही करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com